Next Week Multibagger Stock:- जर आपण हा चालू आठवडा बघितला तर अगदी शेवटच्या दिवशी मार्केटमध्ये चढ-उतार दिसून आले. बाजाराचा जर एकंदरीत कल बघितला तर यामध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री दिसून आली. अनेक महत्त्वाचे शेअर्समध्ये घसरण झाली व ते घसरणीवर बंद झाले.
साधारणपणे सेन्सेक्समध्ये असलेल्या 30 शेअरपैकी 19 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली व त्यासोबतच निफ्टीच्या 50 शेअर्स पैकी 32 शेअर्समध्ये विक्री दिसून आली व निफ्टी बँकेच्या 12 पैकी दहा शेअर्समध्ये घसरण झाली.
या सगळ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर मात्र बाजार बंद होण्याअगोदर तज्ञांनी गुंतवणूकदारांना आणि व्यापाऱ्यांना बीटीएसटी आणि एसटीबीटी कॉल सुचवले आहेत व यामध्ये ट्रेड करून चांगली कमाई करता येऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
नेमके ते स्टॉक कोणते आहेत व त्यांच्यासाठी देण्यात आलेली टार्गेट प्राईस किती देण्यात आली आहे या संबंधीची माहिती थोडक्यात बघू.
येणाऱ्या आठवड्यात ‘हे’ शेअर्स बाजारात करतील धुमाकूळ
1- लॉरस लॅब्स- गुंतवणूक तज्ञ रचना वैद्य यांनी सोमवारी चांगल्या कमाईकरिता बीटीएसटी कॉल दिला असून लॉरेस लॅब मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे व त्यांनी म्हटले आहे की, 604 रुपयांच्या किमतीवर हा शेअर्स खरेदी करावा व यामध्ये 630 रुपयापर्यंत टार्गेट प्राईस त्यांनी दिली आहे व 590 रुपयांवर स्टॉपलॉस सेट करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
2- टेक महिंद्रा- गुंतवणूक तज्ञ राजेश सातपुते यांनी सोमवारी उत्तम कमाई करता बीटीएसटी कॉल दिला असून टेक महिंद्रा मध्ये खरेदी करावी असा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 1724 रुपयांच्या पातळीवर या शेअरची खरेदी करावी व 1750 ते 1770 रुपयांचे टार्गेट प्राईस याकरिता ठेवावे व स्टॉपलॉस हा १६९५ रुपयांवर सेट करावा असे त्यांनी म्हटले आहे.
3- भारती एअरटेल- अरिहंत कॅपिटलच्या कविता जैन यांनी सोमवारी उत्तम कमाई करिता बीटीएसटी कॉल देताना भारती एअरटेलमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे व 1644 रुपयांच्या पातळीवर हा शेअर खरेदी करावा व 1690 रुपयांची टार्गेट प्राईस याकरिता त्यांनी दिली आहे व स्टॉपलॉस 1620 रुपये सेट करावा असे देखील त्यांनी म्हटले आहे.
4- बीपीसीएल- व्यापारी आणि बाजार तज्ञ म्हणून ओळखले जाणारे अमित सेठ यांनी सोमवारी उत्तम कमाई करिता एसटीबीटी कॉल दिला असून बीपीसीएल मध्ये त्यांनी विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.
263 रुपयांच्या पातळीवर हा शेअर विकावा असे त्यांनी म्हटले आहे व 250 रुपयांचे टार्गेट यामध्ये पाहिले जाऊ शकते असे देखील त्यांनी म्हटले असून स्टॉपलॉस 268 रुपयांच्या पातळीवर सेट केला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.