‘ही’ म्युच्युअल फंड योजना ठरली धमाकेदार! दरमहा 3 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने जमा झाले 7 कोटी; जाणून घ्या माहिती

थोडीशी जोखीम घेण्याची तयारी असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांमध्ये आकर्षक ठरताना दिसून येत असून गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीसाठी पसंती देत असल्याचे सध्या चित्र आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
nippon india growth fund

Nippon India Growth Fund:- थोडीशी जोखीम घेण्याची तयारी असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांमध्ये आकर्षक ठरताना दिसून येत असून गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीसाठी पसंती देत असल्याचे सध्या चित्र आहे.

अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना आहेत व त्यामध्ये व्यवस्थित सल्ला घेऊन जर गुंतवणूक केली तर काही वर्षांनी छोट्याशा रकमेतून देखील मोठा फंड तयार होऊ शकतो व त्यामुळे गुंतवणूकदाराचा म्युच्युअल फंड योजनांकडे गुंतवणुकी करिता कल असल्याचे दिसून येते.

अगदी याच पद्धतीने जर आपण निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाची माहिती घेतली तर या फंडाला लाँच व्हायला 29 वर्ष तीन महिने इतका कालावधी झाला आहे व या संपूर्ण 29 वर्षाच्या कालावधीमध्ये या फंडाने एसआयपी आणि एकरकमी अशा दोन्ही स्वरूपाच्या गुंतवणुकीतून वार्षिक 22 टक्क्यांच्या पुढे परतावा दिलेला आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडात तीन हजार रुपयांची बचत करून गुंतवणूकदार झाले कोट्याधीश
जसे आपण बघितले की, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाला लॉन्च होऊन 29 वर्ष तीन महिने झाले व या 29 वर्षे जुन्या योजनेमुळे गुंतवणूकदाराने दरमहा तीन हजार रुपयांची बचत करून जवळपास सात कोटी रुपये आतापर्यंत मिळवले असते.

या फंडाचे जर आपण 29 वर्षाचे एसआयपीचे आकडे बघितले तर एसआयपीला जवळपास 22.88 टक्क्यांचा वार्षिक परतावा मिळाला आहे. म्हणजेच जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा जर कोणी प्रत्येक महिन्यात तीन हजार रुपये गुंतवले असते तर आता त्या व्यक्तीकडे किंवा गुंतवणूकदाराकडे सुमारे सात कोटी रुपये जमा झाले असते.

मासिक एसआयपी तीन हजार रुपये केल्यानंतर 29 वर्षातील एकूण गुंतवणूक 10 लाख 44 हजार इतके होते व 29 वर्षात एसआयपीचा वार्षिक परतावा 22.88% इतका असून त्यानुसार या 29 वर्षानंतर एसआयपीचे एकूण मूल्य सहा कोटी 91 लाख 85 हजार 819 रुपये इतके झाले.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर कसा दिला परतावा?
८ ऑक्टोबर 1995 ला सुरू झालेल्या या फंडाने एकरकमी गुंतवणूकदारांना गेल्या 29 वर्षात तब्बल 22.81 टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला आहे. त्यानुसार जर बघितले तर एखाद्या गुंतवणूकदाराने एकरकमी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या पैशाचे मूल्य चार कोटी सात लाख 78 हजार 900 रुपये इतके झाले असते.

एक वर्षाचा परतावा
एक वर्ष कालावधी करिता जर या योजनेत एक लाख रुपये गुंतवले असते तर या फंडाने एका वर्षात 26.65 टक्क्यांचा परतावा दिला आहे व या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य एक लाख 26 हजार 900 रुपये इतके झाले असते.

तीन वर्षाचा दिलेला परतावा
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडामध्ये जर एक लाख रुपये तीन वर्ष कालावधीसाठी गुंतवले असते तर तीन वर्षाचा परतावा 25.87% वार्षिक मिळाला आहे व त्यानुसार या गुंतवणुकीचे मूल्य एक लाख 99 हजार पाचशे पन्नास रुपये झाले असते.

पाच वर्षाचा परतावा
जर गुंतवणूकदाराने पाच वर्ष कालावधी करिता एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर निप्पॉन ग्रोथ इंडिया फंडने पाच वर्षाचा परतावा 28.93% इतका दिला आहे व पाच वर्षाच्या कालावधीत एक लाख रुपये गुंतवणुकीचे व्हॅल्युएशन तीन लाख 56 हजार 710 रुपये इतके झाले असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe