कोई धंधा छोटा नहीं होता ! रेल्वे स्टेशनवर सुचली एक भन्नाट कल्पना; सुरु केला वडापावचा व्यवसाय, उभी केली 40 कोटींची कंपनी !

Published on -

Business Success Story : आज आपण अशाच एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने लोकांच्या टोमण्याकडे लक्ष न देता त्याला जे योग्य वाटले ते केले आणि आज यशस्वी होण्याचा तमगा मिळवला आहे. व्यंकटेश अय्यर असे या अवलियाचे नाव आहे.

अय्यर यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांचे टोमणे, कटू बोलणे पचवून आपल्या यशाचा प्रवास सुरू ठेवला आणि आज ते करोडो रुपयांच्या कंपनीचे मालक बनले आहेत. आज त्यांची 50 कोटींची कंपनी असून संपूर्ण देशभरात त्यांच्या कंपनीची चर्चा सुरू आहे. व्यंकटेश यांचा जन्म एका तमिळ कुटुंबात झाला.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आल्यामुळे इतर मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांच्या जशा अशा असतात तशाच त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या देखील अशा होत्या. त्यांच्या कुटुंबातील लोकांना चांगल्या शिक्षणानंतर त्यांनी नोकरी करावे असे वाटे. व्यंकटेश यांना त्यांच्या नातेवाईकांकडून जर तू चांगला अभ्यास केला नाहीस तर वडापाव विकावा लागेल असे नेहमी सांगितले जात असे.

मात्र आज वेंकटेशने शिक्षणानंतर वडापाव विकून तब्बल 50 कोटी रुपयांची फूड कंपनी इस्टॅब्लिश केली आहे. व्यंकटेश सांगतात की, गेल्या काही वर्षांपूर्वी सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांनी मॅकडोनाल्डचा एक 40 फुटाचा बॅनर पाहिला. मग काय त्यांच्या मनात एका भन्नाट बिजनेसची कल्पना सुचली.

ते विचार करू लागले की, जर आपल्या देशात मॅकडोनाल्ड हा परदेशी ब्रँड एवढा फेमस असेल तर आपण मॅकडोनाल्डप्रमाणेच आपला स्वदेशी वडापाव विकला तर किती फेमस होईल. मग काय त्यांनी गोली वडापाव नावाची कंपनी सुरू केली. 2004 मध्ये ही कंपनी सुरू झाली आणि आजच्या घडीला या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 50 कोटी एवढी आहे. या कंपनीच्या आजच्या घडीला संपूर्ण देशभरात 350 आऊटलेट आहेत.

छोट्या मोठ्या सर्वच शहरात या कंपनीने आपले बस्तान बसवले आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचा पहिलं आऊटलेट ठाण्यामध्ये उघडलं होतं. म्हणजेच मुंबईच्या सीएसएमटीवर एका तरुणाला सुचलेल्या व्यवसायाने सुरुवातीला ठाणे आणि नंतर संपूर्ण देशभरात आपला जम बसवला आहे. निश्चितच वेंकटेश यांची ही कहाणी तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe