Post Office : चांगल्या भविष्यासाठी आतापासून गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. पण अनेक लोक गुंतवणूक कुठे करावी या चिंतेत असतात. कारण सध्या बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत, अशास्थितीत स्वतःसाठी योग्य गुंतवणूक शोधणे फार कठीण होते. तसेच बाजारात अनेक जोखमीचे गुंतवणूक पर्याय आहेत, जे उत्तम परतावा देतात.
पण जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या योजना उत्तम पर्याय आहेत, या योजना तुम्हाला सुरक्षेसह चांगला परतावा देखील देतात. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा देते.

महागाईच्या या युगात जर तुम्ही उत्पन्न वाढवण्याचा विचार करत असाल, किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी खास आहे, तुम्ही तुमचे पैसे फक्त 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट करू शकता. किसान विकास पत्र योजनेवर तुम्हाला दरवर्षी ७.५ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. यामध्ये कोणीही एकाच वेळी गुंतवणूक करू शकतो. तो शेतकरीच पाहिजे असे नाही. या योजनेतून तुम्ही गरज भासल्यास अडीच वर्षानंतरही पैसे काढू शकता.
पोस्टल विभागाची ही योजना तुम्हाला FD पेक्षा जास्त व्याजाचा लाभ देते. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ७.५ टक्के व्याज मिळते. टर्म डिपॉझिटमध्ये 1 वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9 टक्के व्याज मिळते, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के आणि 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज मिळते. अशास्थितीत किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरते कारण येथे तुम्हाला इतर पर्यांपेक्षा जास्त व्याज दिले जातात.