NTPC Green Energy Share Update:- गेल्या काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये चर्चेत राहिलेले आयपीओ जर बघितले तर यामध्ये पीएसयू एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ देखील यामध्ये समाविष्ट होता व हा आयपीओ देखील खूप चर्चेत राहिला होता.इतकेच नाहीतर जेव्हा बाजारामध्ये हा शेअर ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता.
परंतु आता मात्र काही तज्ञांनी या शेअरच्या बाबतीत नकारात्मक संकेत दिले असून जवळपास त्याच्यात 40 टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज स्टॉक मार्केट तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसे पाहायला गेले तर मंगळवारी या शेअरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली व दहा टक्क्यांच्या वाढीसह 120.98 च्या पातळीवर बंद झाला.
परंतु सोमवारी मात्र एनटीपीसी ग्रीन शेअरने तब्बल 52 आठवड्यांची निचांकी पातळी गाठत 109.41 रुपयांपर्यंत घसरण त्यामध्ये झाली होती. ही घसरण जर बघितली तर हा आयपीओ मार्केटमध्ये जेव्हा लॉन्च करण्यात आला होता तेव्हाच्या त्याच्या इशू किमतीच्या जवळपास होती.
एक महिन्याच्या अनुषंगाने बघितले तर यामध्ये 14.84 टक्क्यांची घसरण झालेली आहे व त्यामध्ये परत घसरण होऊन तो 100 रुपयांच्या खाली येईल असा अंदाज तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे.
एनटीपीसी ग्रीन शेअरसाठी देण्यात आली SELL रेटिंग
या शेअर बाबत ॲबिट ब्रोकिंग फर्मच्या माध्यमातून नकारात्मक संकेत देण्यात आले आहेत व या फर्मच्या माध्यमातून या शेअरसाठी जवळपास 70 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे व सेल रेटिंग देखील जाहीर करण्यात आली आहे. याचा अर्थ हा शेअर सध्याची त्याची जी काही किंमत पातळी आहे त्यापेक्षा देखील 40 टक्क्यांनी घसरू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.
एनटीपीसी एनर्जीकडून देण्यात आली महत्त्वाची अपडेट
एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जीच्या माध्यमातून मात्र याबाबत अपडेट देण्यात आले असून त्यामध्ये म्हटले आहे की, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने सध्या दोन वेगवेगळ्या सौर प्रकल्पांमधून 110 मेगावॅट विजेचा व्यावसायिक पुरवठा सुरू केला आहे व त्यामुळे या ग्रुपची आता एकूण स्थापित आणि कमर्शियल क्षमता 76,708.18 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.