Ola Electric Share:- इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. कंपनीने या तिमाहीत 1069 कोटींचा महसूल नोंदवला असून ऑटोमोटिव्ह विभागाचा ग्रॉस मार्जिन 20.8% पर्यंत पोहोचला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत मार्जिनमध्ये 0.20% वाढ झाली आहे. मात्र EBITDA तोटा 169 कोटींवरून ₹l309 कोटींपर्यंत वाढला आहे.याचा अर्थ कंपनीला अजूनही नफ्याचा टप्पा गाठायचा आहे.
या तिमाहीत 84029 इलेक्ट्रिक दुचाकी वितरित करण्यात आल्या असून कंपनीने नवीन तिसऱ्या पिढीची S1 स्कूटर लॉन्च केली आहे. या घोषणेनंतरही शेअर बाजारात ओला इलेक्ट्रिकच्या स्टॉकमध्ये काहीशी घसरण दिसून आली. सध्या हा शेअर 68 च्या आसपास व्यापार करत आहे आणि अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी यामध्ये चांगली संधी निर्माण झाली आहे.
![ola electric share](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zoo.jpg)
ब्रोकरेज कंपन्यांची टार्गेट प्राईस
ओला इलेक्ट्रिकच्या शेअरबाबत गोल्डमन सॅक्स आणि सिटी यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपन्यांनी आपली शिफारस दिली आहे.गोल्डमन सॅक्सने ओला इलेक्ट्रिकच्या शेअरसाठी पूर्वी 118 चे लक्ष्य दिले होते.
ते आता 101 पर्यंत कमी केले आहे.परंतु खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे.CITI ब्रोकरेजनेही खरेदीची शिफारस कायम ठेवली आहे, मात्र टार्गेट प्राईस 90 वरून 85 पर्यंत खाली आणली आहे.याचा अर्थ तज्ञांचा अजूनही विश्वास कायम आहे आणि सध्याच्या किंमतीपेक्षा पुढील काही महिन्यांत शेअर 50% पर्यंत वाढण्याची संधी आहे.
ओला इलेक्ट्रिकचा बाजारातील हिस्सा
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात ओला इलेक्ट्रिकने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा बाजार हिस्सा 25.5% इतका राहिला असून या क्षेत्रात ओला आघाडीवर आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीने Ola Gig, Gig+ आणि S1 Z ही एंट्री-लेव्हल स्कूटर्स लाँच केल्या होत्या.ज्यामुळे स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मोठी बाजारपेठ खुली झाली. याशिवाय, कंपनीने रोडस्टर X आणि रोडस्टर X+ ही इलेक्ट्रिक मोटारसायकली लाँच करून नव्या विभागात प्रवेश केला आहे.
नवीन उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा विकास
कंपनी आपली पुढील पिढीतील स्कूटर्स आणि बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जनरेशन 3 स्कूटर्स, जनरेशन 2 स्कूटर्सपेक्षा 20% अधिक पॉवरफुल असतील.तसेच जास्त सुरक्षित आणि ऊर्जा कार्यक्षम असतील.
रोडस्टर मालिकेच्या मदतीने ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक मोटरसायकल मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.पारंपरिक पेट्रोल मोटरसायकलींच्या तुलनेत ओला इलेक्ट्रिकची स्कूटर 40% वेगवान असेल आणि तिची पीक पॉवर दुप्पट अधिक असेल.
कंपनीचे भविष्यकालीन प्रकल्प
कंपनीने आगामी काळात काही मोठ्या योजनांची घोषणा केली आहे त्यामध्ये, 2025 च्या चौथ्या तिमाहीत जनरेशन 3 स्कूटर्स लाँच केल्या जातील.2026 च्या पहिल्या तिमाहीत कंपनी गिग/गिग+, S1 Z आणि रोडस्टर मोटरसायकल लाँच करणार आहे.स्वतःची विकसित केलेली 4680 बॅटरी टेक्नॉलॉजी 2026 पासून सर्व उत्पादनांमध्ये वापरण्यात येईल.
ओला इलेक्ट्रिक स्टॉक गुंतवणुकीसाठी योग्य का?
सध्या हा शेअर 68 च्या दरम्यान उपलब्ध असून त्याचा सर्वकालीन नीचांक 65 आहे तर उच्चांक 157 आहे. ब्रोकरेज कंपन्यांच्या मते हा स्टॉक पुढील 6-12 महिन्यांत 40-50% वाढू शकतो.
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ओला इलेक्ट्रिक एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण कंपनीचा बाजारातील हिस्सा मोठा आहे आणि भविष्यातील योजना मजबूत आहेत.