DA Hike Breaking News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचारी महागाई भत्त्याची (DA) चातकाप्रमाणे वाट पाहत होते.
येत्या 28 सप्टेंबरला केंद्र सरकार (Central Govt) महागाई भत्ता वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होईल.

28 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीच्या दोन दिवसांनंतर सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी तिजोरी उघडणार आहे. 28 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता (DA increase) वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.
अद्याप अधिकृत घोषणा नाही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले जात आहे की 28 सप्टेंबर रोजी सरकार (Govt) डीए वाढवू शकते, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
38% डीए मिळेल
सरकार डीएमध्ये 4 टक्के घोषणा करणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या पगारात वाढलेल्या महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून वाढीव डीए लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांची थकबाकी म्हणून पैसे मिळतील.
पगार किती वाढणार?
अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार (All India Consumer Price Index), महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते. तुमच्या वेतनश्रेणीनुसार तुमचा पगार वाढवला जाईल.
जर तुमचे मूळ वेतन 18000 रुपये असेल तर तुमचा पगार वार्षिक 6840 रुपयांनी वाढेल. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे.