Business Success Story : आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला संघर्ष आलेला असेल. काही अजूनही संघर्ष करत असतील. तर काहींनी संघर्षावर यशस्वी मात करत आता यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असेल. खरेतर जीवनात संघर्ष हा करावा लागतोच. जें लोक आपल्या वाटेला आलेल्या अडचणींवर यशस्वी मात करतात, खडतर परिस्थितीशी मुकाबला करतात ते लोक यशस्वी होतात.
अनेक यशस्वी लोकांनी हे आपल्या उदाहरणातून वेळोवेळी दाखवून दिले आहे. दरम्यान आज आपण अशा एका उद्योजकाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने खडतर परिस्थितीवर मात करत यशस्वी उद्योजक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सुशील सिंह असे त्यांचे नाव आहे. सुशील यांनी एकेकाळी अकरा हजारावर कंपनीत काम केले.

घरची परिस्थिती हालाखीची आणि नोकरींत पगारही जेमतेम यामुळे त्यांना त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागला. पण ते खचले नाहीत, हारले नाहीत आणि आज ते उद्योग क्षत्रात यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. सुशील आज तीन बड्या कंपनीचे मालक आहेत. दुसऱ्याच्या कंपनीत मात्र अकरा हजारावर कामाला असणारा हा नोकर आज शेकडो लोकांना रोजगार देणारा करोडो रुपयांच्या साम्राज्याचा मालक बनला आहे.
बारावीत झालेत नापास
सुशील यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती ही खूपच नाजूक होती. दोन वेळच्या जेवणाची देखील भ्रात होती. त्यांचे वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे. यामुळे वडिलांच्या पगारावर घर चालणे मुश्किल होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य देखील मिळत नसे. याचाच परिणाम म्हणून ते बारावीत नापास झालेत.
मात्र त्यांनी तरीही हिंमत हरली नाही आणि पुन्हा एकदा बारावीचे परीक्षा देत बारावी उत्तीर्ण होऊन अलाबाद युनिव्हर्सिटी मध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू केले. मात्र त्यांनी पुढे हे शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि पॉलिटेक्निकचा कोर्स केला. यानंतर मग त्यांनी काही काळ सेल्स एक्झिक्यूटिव्ह म्हणून नोकरी केली. या नोकरीत त्यांना फक्त 11,000 रुपये एवढा पगार होता. एवढ्याशा पगारात त्यांना घर चालवावे लागत असे.
अशी झाली व्यवसायाची सुरुवात
सुशील यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणशी विवाह केला. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात बदल झाला. विवाह झाल्यानंतर या दांपत्याने नोएडा येथे अमेरिकामधील कंपनीच्या सहकार्याने बीपीओ सुरु केला. यानंतर त्यांनी अमेरिकेतच SSR टेक विजन नावाची कंपनी सुरू केली.
ही कंपनी तीन-चार महिने चालवल्यानंतर त्यांना नोएडा येथे जागा मिळाली. यानंतर मग त्यांचा व्यवसाय हळूहळू फुलू लागला. आजच्या घडीला सुशील एसआरएस टेकविजन, डीबाको आणि साइवा सिस्टीम या कंपन्या चालवत आहेत. एकंदरीत सुशील यांनी आपल्या सेक्युरिटी गार्ड बापाच्या कष्टाचे पांग फेडले आहेत. त्यांचा हा प्रवास नवयुवक तरुणांसाठी आदर्शवत आणि मोठा प्रेरणादायी राहणार आहे.