ONGC Share Price: 1 वर्षात 29% ची घसरण! ‘या’ तेल कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत? खरेदी करावा का?

Published on -

ONGC Share Price:- आज 28 ऑगस्ट 2025 रोजी शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे आपल्याला दिसून आले असून अगदी मार्केट बंद होण्याच्या वेळेस देखील सर्वच महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या जर आपण बघितले तर महत्वाचे असलेल्या बीएसई सेन्सेक्स या निर्देशांकामध्ये 707.42 अंकांची मोठी घसरण झाली आहे व या घसरणीसह सेन्सेक्स 80087.49 वर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 50 मध्ये देखील 212.25 अंकांची घसरण झाली आहे व सध्या 24497 वर व्यवहार करत आहे. या घसरणीचा फटका ओएनजीसी अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरला बसला असून सध्या या शेअरमध्ये 1.55 अंकांची घसरण झाली असून तो 232.49 रुपयांवर ट्रेड करत आहे.

ओएनजीसी शेअरची आजची स्थिती

आज जेव्हा मार्केटची ओपनिंग झाली तेव्हा ओएनजीसी शेअरची किंमत 234 रुपये होती व त्यामध्ये घट होत सध्या हा शेअर्स 232.49 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच आतापर्यंतची आजची या शेअरची उच्चांकी पातळी 235.28 रुपये इतकी राहिली तर नीचांकी पातळी 232.97 रुपये इतकी राहिली आहे. तसेच 52 आठवड्यांची कामगिरी बघितली तर 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी 334.40 रुपये तर नीचांकी पातळी 205 रुपये इतकी राहिली आहे.

ओएनजीसी शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा

आतापर्यंत ओएनजीसी शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर एक वर्ष कालावधीकरिता केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना -28.86%, सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर +1.28%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर -4.33% आणि एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -2.64% इतका परतावा दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe