Online Shopping:- गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कपडे, शूज, हॅन्डमेड ज्वेलरी इतर अनेक वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. सध्या जर आपण बघितले तर ऑनलाइन शॉपिंग ट्रेंडमध्ये बरेच जण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशो सारख्या अनेक लोकप्रिय अशा वेबसाईट आहेत व मोठ्या प्रमाणावर या वेबसाईटवरून खरेदी केली जाते. परंतु या व्यतिरिक्त देखील अशा काही आकर्षक वेबसाईट असून यावर तुम्ही अगदी तुमच्या बजेटमध्ये स्टायलिश आणि स्वस्त अशा खरेदीचा अनुभव घेऊ शकतात. चला तर मग या लेखामध्ये अशाच वेबसाईटची थोडक्यात माहिती बघू.
स्वस्त खरेदीसाठी लोकप्रिय अशा वेबसाईट
1- लाइमरोड- ही एक अतिशय महत्त्वाची अशी वेबसाईट असून महिलांना जर काही खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी ही वेबसाईट एक खजिना आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या वेबसाईटवर पंचवीस लाख पेक्षा अधिक ट्रेंडी फॅशन उत्पादने, विविध प्रकारचे कपडे तसेच ॲक्सेसरीज आणि फुटवेअर उपलब्ध आहेत व स्वस्त दरात तुम्हाला त्या ठिकाणी या वस्तू मिळतात. तसेच या वेबसाईटवर अनेक प्रकारचे डिस्काउंट ऑफर आणि सणासुदीच्या कालावधीत सेल सुरू असतात व त्यामुळे तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगली फॅशनेबल वस्तूंची खरेदी करता येणे शक्य आहे.

2-बेनी- ही देखील ऑनलाईन खरेदीसाठी एक लोकप्रिय अशी वेबसाईट असून या वेबसाईटच्या माध्यमातून पुरुष तसेच महिला आणि मुलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कपड्यांची खरेदी करता येते. या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पारंपारिक कपड्यांपासून तर अत्यंत कॅज्युअल कपड्यांपर्यंत सर्व काही बजेटमध्ये मिळते.
3- शॉपक्लूज- ही देखील एक लोकप्रिय वेबसाईट आहे व तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक्स तसेच फॅशन आणि घरगुती वस्तू खरेदी करायचे असतील तर ही वेबसाईट त्यासाठी फायद्याची ठरू शकते. या वस्तूंसाठी अत्यंत स्वस्त डील आपल्याला या ठिकाणी मिळते. तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल किंवा घराच्या सजावटीसाठी लागणारे आवश्यक वस्तू या वेबसाईटवर तुम्हाला स्वस्त दरात मिळतात. विशेष म्हणजे या तीनही वेबसाईटचे मोबाईल ॲप देखील उपलब्ध असून तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात व या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करणे अधिक सोपे जाते. या तीनही वेबसाईटवर तुम्हाला सतत आकर्षक ऑफर्स, कॅशबॅक आणि फ्लॅश सेलमुळे आवडीच्या वस्तू कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळू शकतात.