पोस्ट ऑफिस बचत खाते उघडा आणि लाखोंचा नफा मिळवा! वाचा कोणते मिळतात फायदे?

Published on -

Post Office Saving Account Scheme:- तुम्ही किती पैसा कमावता याला जितके महत्त्व आहे त्यापेक्षा तुम्ही कमवत असलेल्या पैशांमधून बचत किती करता याला अतिशय महत्त्व आहे. तसेच या बचत केलेल्या पैशांचे गुंतवणुकीच्या दृष्टीने नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करतात यावर सगळा आर्थिक डोलारा अवलंबून असतो. सध्या आपल्याला माहित आहे की प्रत्येकासाठी बचत खाते खूप महत्त्वाचे असून अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंतचे अनेक फायदे आपल्याला बचत खात्याच्या माध्यमातून मिळत असतात. प्रत्येक जण बँकांमध्ये बचत खाते उघडतो व त्या खात्यांमध्ये बचत केलेले पैसे हे ठेवले जातात. परंतु बँकांमध्ये जर आपण बघितले तर बऱ्याच सरकारी बँकांमध्ये बचत खात्यावर अवघे 2.70% इतके व्याज मिळते. परंतु त्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिस बचत खात्यावर चार टक्के वार्षिक व्याज मिळते व हा व्याजदर बँकांपेक्षा जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते. चला तर मग या लेखात आपण बघू की पोस्ट ऑफिस बचत खात्यावर कोणते फायदे मिळतात व बँकांमधील बचत खात्यापेक्षा पोस्ट ऑफिस बचत खाते कशा पद्धतीने फायद्याचे आहे?

पोस्ट ऑफिस बचत खात्याचे फायदे

पोस्ट ऑफिसची बचत योजना ही बँकांमधील बचत खात्याला एक उत्तम असा पर्याय आहे. तुम्हाला जर पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडायचे असेल तर तुम्हाला पाचशे रुपये भरून ते उघडता येते व कमीत कमी ठेवीची यामध्ये आवश्यकता असते. सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यावर चार टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. त्यातून जर आपण बघितले तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांमध्ये तीन टक्के ते 3.50% इतके बचतीवर व्याज देण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक सारख्या महत्त्वाच्या सरकारी बँकांमध्ये जर बचत खाते असेल तर त्यावर 2.70% इतके व्याज मिळत आहे. या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की पोस्ट ऑफिस बचत खात्यावर मिळणारे व्याज हे बँकांपेक्षा जास्त आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे फक्त पाचशे रुपये जमा करून तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडू शकतात. सरकारी बँकांमध्ये तुम्हाला किमान शिल्लक 1000 ते 3000 रुपयांपर्यंत ठेवणे गरजेचे असते. तसेच अनेक खाजगी बँकांमध्ये किमान शिलकीची मर्यादा दहा हजार रुपयापर्यंत आहे. कमीत कमी किमान रक्कम आणि मिळणारा चांगला व्याजदर यामुळे पोस्ट ऑफिस बचत खाते तरुणांसाठी आणि लहान गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अतिशय लोकप्रिय असा पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर मिळणाऱ्या महत्त्वाच्या सुविधा

तसेच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडले तर तुम्हाला एटीएम कार्ड,ई बँकिंग सुविधा तसेच चेकबुक आणि मोबाईल बँकिंग सारख्या सुविधा देखील मिळतात. तसेच तुम्ही तुमची पोस्ट ऑफिस बचत खाते आधार कार्डशी लिंक केले तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचे लाभ देखील मिळू शकतात. म्हणजेच बँकेप्रमाणे तुम्हाला अनेक डिजिटल बँकिंगचे पर्याय देखील यामध्ये दिले जातात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस बचत खात्यावर तुम्हाला जे काही व्याज मिळते त्यावर दहा हजार रुपये पर्यंत करात सूट दिली जाते. त्यामुळे पोस्ट ऑफिस बचत खात्यात केलेली बचत अधिक फायद्याची ठरते. पोस्ट ऑफिस भारत सरकारच्या माध्यमातून चालवली जात असल्याने यात केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते. कोणत्याही भारतीय प्रौढ नागरिकाला पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते व यामध्ये जॉईंट अकाउंट देखील उघडता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe