ओसस्वाल पंप्सचा 1387 कोटींचा IPO आजपासून ओपन! गुंतवणूकदारांना मिळणार 11% नफ्याची संधी

Published on -

Oswal Pumps IPO Price:- आजच्या शेअर बाजारात एक महत्त्वाची घडामोड घडली व ती म्हणजे ओसवाल पंप्स या कंपनीचा बहुचर्चित IPO आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. देशात सौर पंप निर्मितीत वेगाने नाव कमावणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी एक मोठ्या संधीचा दरवाजा उघडला आहे. एकूण ₹१,३८७ कोटी रुपयांचा हा इश्यू असून तो १७ जूनपर्यंत खुला राहणार आहे.

ओसवाल पंप्सच्या IPO ची दोन भागात आहे विभागणी

ओसवाल पंप्सचा हा IPO दोन भागांत विभागलेला आहे. एक भाग म्हणजे ₹८९० कोटी रुपयांचे नव्या शेअर्सचा इश्यू, तर दुसऱ्या भागात कंपनीचे प्रवर्तक विवेक गुप्ता हे आपले ८१ लाख शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहेत. याचा थेट अर्थ असा की कंपनीत नव्या गुंतवणुकीसह काही प्रमाणात प्रवर्तकांकडून शेअर विक्रीही होणार आहे.

या आयपीओची किंमत किती?

गुंतवणूकदारांसाठी या IPO चा किंमतपट्टा ₹५८४ ते ₹६१४ प्रति शेअर असा ठेवण्यात आला आहे. किमान २४ शेअर्ससाठी अर्ज करता येणार असून, त्यानंतर फक्त त्याच्या पटीतच बोली लावता येणार आहे. या संदर्भात एक दिलासादायक बाब म्हणजे IPO सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच, म्हणजे १२ जून रोजी, कंपनीने काही प्रतिष्ठित अँकर गुंतवणूकदारांकडून ₹४१६ कोटी रुपये उभारले. यात सोसायटी जनरल, स्मॉलकॅप वर्ल्ड फंड आणि ICICI प्रुडेन्शियल यांसारख्या नावाजलेल्या संस्थांचा सहभाग होता. त्यांनी प्रत्येकी ₹६१४ या उच्च दराने शेअर्स खरेदी केले.

आता जर ग्रे मार्केटकडे पाहिलं, तर ओसवाल पंप्सच्या शेअर्सचा प्रीमियम सध्या ₹६८ इतका आहे. म्हणजेच, जर हा प्रीमियम खरा ठरला तर शेअर लिस्टिंगच्या दिवशी म्हणजेच बाजारात पहिल्यांदा आला तेव्हा त्याची किंमत सुमारे ₹६८२ इतकी असू शकते. याचा अर्थ गुंतवणूकदारांना जवळपास ११ टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News