PAN Card : सावधान ! तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर तर होत नाही ना?, अशा प्रकारे ऑनलाइन तपासा…

Ahmednagarlive24 office
Published:
PAN Card New Update

PAN Card New Update : सध्याच्या काळात पॅन कार्ड हा महत्वाचा दस्तऐवज आहे. आपले बँक खाते, मालमत्ता व्यवहार, इत्यादींसाठी पॅनकार्ड जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये अनिवार्य आहे. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असल्याने त्याची गोपनीयता राखणे महत्त्वाचे आहे.

आयकर विभाग आपल्या सर्व पॅनकार्ड धारकांना कार्डचा इतिहास तपासण्याचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांचे पॅन कार्ड कोणत्या ठिकाणी वापरले गेले आहे हे कळण्यास मदत होते. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या पॅन कार्डचा इतिहासत पासायचा असेल तर आज आम्ही त्याची सोपी प्रक्रिया सांगणार आहोत.

पॅन कार्डचा इतिहास कसा तपासायचा?

-यासाठी सर्वप्रथम https://www.cibil.com/ या वेबसाइटला भेट द्या.
-यानंतर तुम्हाला Get CIBIL Score वर क्लिक करावे लागेल.
-CIBIL स्कोअर तपासण्यापूर्वी, तुम्हाला सबस्क्रिप्शन योजना निवडावी लागेल आणि येथे पेमेंट करावे लागेल.
-पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी सारखे सर्व तपशील भरावे लागतील.
-आता लॉगिन आयडी आणि पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स आयडी निवडावा लागेल.
-पुढे, तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि आपली ओळख सत्यापित करा या पर्यायावर क्लिक करा.
-यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमची सिबिल कशी आहे हे कळेल.
-यासोबतच, पॅनकार्डच्या इतिहासात तुम्ही तुमचे पॅन कार्ड वापरून किती कर्ज घेतले आहे हे दिसेल.
-जर असे कोणतेही कर्ज असेल जे तुम्ही घेतले नसेल तर, तुम्ही पॅन कार्ड इतिहासाद्वारे त्याची माहिती घेऊ शकता.

पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल येथे तक्रार करा

-जर तुम्ही तुमचा पॅन कार्ड इतिहास तपासला आणि तुम्ही केलेला कोणताही चुकीचा व्यवहार आढळला, तर तुम्ही त्याची लगेच आयकर विभागाकडे तक्रार करू शकता.

-तुमची तक्रार नोंदवण्यासाठी, त्याच्या अधिकृत वेबसाइट https://incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp वर क्लिक करा. तुमचे सर्व तपशील येथे भरा.

-यानंतर तुमची तक्रार नोंदवा. यानंतर त्याची सर्व माहिती सबमिट करा. यानंतर तुमची तक्रार नोंदवा. यानंतर तक्रार नोंदवून त्यावर कारवाई करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe