Paytm Application : देशात अलीकडे यूपीआयने व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कॅशलेस इकॉनोमीला चालना देण्यासाठी शासनाकडून सुद्धा UPI वापरण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही युपीआयने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी पेटीएम ने पेमेंट करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण ती पेटीएम ने एक नवीन ऑफर सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत पेटीएम ने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना सोन्याचे कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

खरे तर सध्या संपूर्ण देशभर नवरात्र उत्सवाची मोठी धूम सुरू आहे. यानंतर विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा होईल आणि पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या हंगामात विविध कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणल्या जात आहेत. पेटीएम ने देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे.
फिनटेक कंपनी पेटीएमने आपल्या एक्सचेंज फायलिंग मध्ये या ऑफर बाबत माहिती दिली आहे. कंपनीने सणासुदीच्या दिवसात त्यांच्या युजर्सला प्रत्येक पेमेंटसाठी सोन्याचे नाणे बक्षीस देण्याचा निर्णय घेतलाय.
पेटीएम ने आपल्या ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर गोल्ड कॉइन देण्याचा निर्णय घेतलाय. रिवार्ड म्हणून दिली जाणारी गोल्ड कॉइन पुढे डिजिटल सोन्यात रूपांतरित करता येऊ शकतात.
या ऑफर अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी व्यवहार मूल्याच्या 1 टक्के किमतीचे सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. यातील 100 गोल्ड कॉइन 1 रुपयांच्या समतुल्य असतील.
तसेच क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्यांना दुप्पट फायदा दिला जाणार आहे. म्हणजेच त्यांना दुप्पट गोल्ड कॉइन मिळणार आहेत. 10 हजार रुपयांच्या व्यवहारावर 100 कॉइन मिळतील. गोल्ड कॉइनची प्रत्येकाची किंमत अंदाजे 15 रुपये राहणार आहे.
अर्थात ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर 0.01% कॅशबॅक मिळणार आहे. पण हा कॅशबॅक रोख रकमेऐवजी गोल्ड कॉइनच्या अर्थात डिजिटल सोन्याच्या स्वरूपात मिळणार आहे.