Sarveshwar Foods Penny Stock:- शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह उघडल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशावाद वाढला आहे. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली होती आणि या सकारात्मक ट्रेंडमुळे अनेक शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली आहे.याच पार्श्वभूमीवर सर्वेश्वर फूड्स या एफएमसीजी क्षेत्रातील पेनी स्टॉकमध्येही तेजी दिसून येत आहे.
हा शेअर सध्या 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत व्यवहार करत असून त्यामध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.या वाढीमागे मुख्य कारण म्हणजे या शेअरला इन्फॉर्मेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगकडून मिळालेल्या सुधारित क्रेडिट रेटिंगमुळे गुंतवणूकदारांच्या हालचाली वाढल्या आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-25.jpg)
सर्वेश्वर फूड्सच्या शेअरची किंमत
या शेअरची बुधवारी 8.20 रुपयांवर पोहोचली.जी मंगळवारी 7.34 रुपयांवर होती. सध्या जरी हा शेअर 15.73 रुपयांच्या उच्चांकी पातळीपेक्षा 48 टक्क्यांनी खाली असला तरी त्याने 7.34 रुपयांच्या नीचांकी स्तरावरून 11 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे.गुंतवणूकदारांसाठी ही लक्षणीय वाढ आहे.कारण अल्प कालावधीत अशा शेअर्समध्ये मोठे चढ-उतार होऊ शकतात.
या कंपनीचे रेटिंग महत्त्वाचे
कंपनीच्या पतपात्रतेत सुधारणा दर्शविणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे क्रेडिट रेटिंग अपग्रेड. इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंगने कंपनीच्या 114.01 कोटी रुपयांच्या दीर्घकालीन बँक सुविधेचे रेटिंग ‘आयव्हीआर बीबीबी +/स्टेबल’ वर कायम ठेवले आहे.
तसेच 23.80 कोटी रुपयांच्या अल्पमुदतीच्या बँक सुविधेचे रेटिंग ‘आयव्हीआर ए 3+’ वरून ‘आयव्हीआर ए 2’ वर अपग्रेड करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे कंपनीच्या वित्तीय स्थैर्यावर अधिक विश्वास व्यक्त केला जात आहे आणि भविष्यातील गुंतवणुकीस चालना मिळू शकते.
कंपनीला मिळाली होती मोठी ऑर्डर
डिसेंबर 2024 मध्ये कंपनीला अमेरिकेतील आय सिफोल एलएलसीकडून 498 दशलक्ष रुपये किमतीच्या 5350 मेट्रिक टन बासमती तांदळाच्या निर्यातीचा मोठी ऑर्डर मिळाल्या होत्या.हा करार कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी महत्त्वाचा टप्पा आहे आणि सेंद्रिय तांदूळ उत्पादनांना वाढती मागणी असल्याचे दर्शवतो. त्यामुळे भविष्यातही अशा करारांमुळे शेअरची किंमत स्थिर राहण्याची आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे.
या शेअरची मागच्या एक वर्षाची कामगिरी
तथापि या शेअरच्या कामगिरीचा मागील काळात घेतलेला आढावा पाहता गेल्या एका महिन्यात तो ३ टक्क्यांनी घसरला आहे.तर सहा महिन्यांच्या कालावधीत ७ टक्क्यांहून अधिक घट नोंदवली आहे. गेल्या वर्षभरात सर्वेश्वर फूड्सच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे 9 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.
मात्र दीर्घकालीन विचार करता या शेअरने मागील पाच वर्षांत 430 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.त्यामुळे अल्पकालीन गुंतवणुकीसाठी जोखीम असली तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर आकर्षक ठरू शकतो.
सर्वेश्वर फूड्सचा शेअर खरेदी करावा का?
सर्वेश्वर फूड्सच्या शेअरमध्ये अल्पकालीन चढ-उतार असूनही दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती, सुधारित क्रेडिट रेटिंग आणि सेंद्रिय तांदूळ व्यवसायातील मागणी या घटकांचा विचार करता गुंतवणूकदारांनी हा शेअर त्यांच्या पोर्टफोलिओसाठी विचारात घेण्यासारखा आहे.मात्र शेअर बाजारातील कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी योग्य संशोधन आणि जोखमींचा विचार करणे आवश्यक आहे.