Penny Stock:- हे शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असते व या चढ उतारामध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक मात्र गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न देतात. परंतु या मल्टीबॅगन स्टॉक ऐवजी बऱ्याच पेनी स्टॉक देखील मोठ्या प्रमाणावर रिटर्न गुंतवणुकीवर देतात. या मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर मागील एक वर्षापासून बऱ्याच पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना खूप मोठा आर्थिक फायदा करून दिलेला आहे. यामध्ये काही शेअरची किंमत पाच रुपयांपेक्षा कमी असून सहज कमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला देखील ते खरेदी करता येऊ शकतात. आपण जर महत्वाची आकडेवारी बघितली तर काही पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे काही पटीने वाढवले आहेत व काही स्टॉक ने गुंतवणूकदारांना 500 टक्क्यापर्यंत देखील रिटर्न दिलेला आहे.
या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल
पेनी स्टॉकच्या यादीमध्ये जर आपण बघितले तर कन्सिक्युटिव्ह इन्व्हेस्टमेंट हा शेअर इतरांना जास्त परतावा देणारा ठरला असून यामध्ये 250 टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ दिसून आली आहे. यासोबतच गायत्री हायवेज, एक्सेल रिअल्टी इन इन्फ्रा, अवान्स टेक्नॉलॉजी, अवान्स टेक्नॉलॉजीज आणि लँडमार्क लिझर कार्पोरेशन यासारख्या पेनी स्टॉकचा देखील समावेश असून यामध्ये देखील 100% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

पेनी स्टॉक खरेदीबाबत तज्ञांचे म्हणणे काय?
पेनी स्टॉकबद्दल तज्ञ म्हणतात की, या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर काही कालावधीसाठी चांगला पैसा मिळणे शक्य आहे. परंतु यामध्ये धोका देखील जास्त असतो. यात जर पैसे गुंतवले तर नुकसान देखील होऊ शकते. कारण तज्ञांचे म्हणणे आहे की या शेअर्समध्ये लिक्विडिटी कमी असते. तुम्ही ज्या कंपनीत पैसे गुंतवत आहात त्याची पुरेशी माहिती मिळत नाही व त्यांचे व्यवहार व्यवस्थित चालतील की नाही याबद्दल देखील शंका असते. म्हणूनच गुंतवणूकदारांनी विचार करून पैसे गुंतवावे आणि कोणताही विचार न करता कोणत्याही शेअरच्या मागे लागू नये असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.