JP Power Share Price : गेले काही दिवसांपासून जर आपण बघितले तर शेअर मार्केटमध्ये घसरणीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे व यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या टॅरीफ बॉम्बचा हा सगळा परिणाम दिसून येत आहे.
आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार असून आज देखील मार्केटची सुरुवात मुळातच घसरणीने झाली. जेव्हा आजच्या ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हापासूनच सेन्सेक्स तब्बल 476.12 अंकांनी घसरला व 80147.14 वर पोहोचला आहे. तीच परिस्थिती निफ्टीची देखील असून निफ्टीमध्ये देखील घसरण झाली असून सध्या निफ्टी 24453.65 वर आहे.

142.50 अंकांची घसरण दिसून येत आहे. तीच गत निफ्टी बँक, आयटी निर्देशांकाची देखील असून यामध्ये देखील अनुक्रमे 0.41% तर 0.78 टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु या घसरणीच्या ट्रेंडमध्ये मात्र जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेडचा शेअर्स चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे.
जयप्रकाश पावर वेंचर्स लिमिटेड शेअरची सध्याची स्थिती काय?
11 ऑगस्ट 2025 वार सोमवारी जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीत 0.47% ची वाढ दिसून आली व या वाढीसह सध्या हा शेअर्स 19.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज जर या शेअरची ओपनिंग बघितली तर ती 19.45 रुपयांवर होती व आतापर्यंत हा शेअर्स 19.56 रुपयांच्या उचांकी पातळीवर आहे.
तर आपण जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी बघितली तर ती 27.7 रुपये होती व नीचांकी पातळी 12.36 इतकी होती. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 13,159 कोटी रुपये आहे. आज हा शेअर 19.02 रुपये ते 19.56 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे.
या कंपनीने आजपर्यंत दिलेला परतावा
जर आपण या कंपनीने आजपर्यंत गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर तो पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर +564.14% इतका दिला आहे. तर तीन वर्षाच्या गुंतवणुकीवर +145.35%, एक वर्षाच्या गुंतवणुकीवर +9.87% इतका परतावा दिला आहे
ह्या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की साधारणपणे जयप्रकाश पॉवर वेंचर लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना उत्तम असा परतावा दिलेला आहे. तसेच सध्या या शेअरसाठी तज्ञांनी 24 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे व 19.25 रुपये सध्याची किंमत आहे. तसेच रेटिंग जर बघितली तर ती होल्ड अशी देण्यात आलेली आहे.