Penny Stocks : पेनी स्टॉक्स सध्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या शेअर्सची किंमत. या शेअर्सच्या किंमती जरी कमी असल्या तरी देखील येथून मिळणार परतावा हा खूप जास्त आहे. मागील काही काळापासून या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे.
खरं तर पेनी शेअर्सची किंमत 1-2 रुपये आणि त्याहूनही कमी असते, पण त्यांच्याकडून मिळालेला परतावा आश्चर्यचकित करणारा असतो. आज अशाच एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत तो म्हणजे लॉयड्स एंटरप्रायझेस, ज्याने गेल्या 4 वर्षांत 2000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
मार्च 2020 मध्ये, लॉयड्स एंटरप्रायझेसचे शेअर्स 1 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते, परंतु आता त्याची किंमत 28 रुपयांपेक्षा जास्त आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या एका वर्षात या शेअरने 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशात 4 पट वाढ झाली आहे.
मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजारात मोठी घसरण झाली तेव्हा या शेअरची किंमत 1.20 रुपये होती. पण, यानंतर हा शेअर वेगाने धावला. विशेष म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीने 4 वर्षांपूर्वी लॉयड्स एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 23 लाख रुपयांपेक्षा जास्त असते. एवढेच नाही तर हा परतावा ४६ लाखांच्या वर गेला. कारण गेल्या वर्षी या शेअरने 47.75 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
कंपनीचा व्यवसाय काय आहे?
लॉयड्स एंटरप्रायझेस ही लोखंड आणि पोलाद उत्पादने तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी पूर्वी श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती, परंतु 2023 मध्ये तिचे नाव बदलून लॉयड्स एंटरप्राइजेस करण्यात आले. कंपनी स्टील प्लांट आणि वीज प्रकल्पांसाठी अवजड यंत्रसामग्री तयार करते.