Pension Scheme : सरकारद्वारे अशा अनेक योजना चालवल्या जातात, ज्यात सामील होऊन सामान्य नागरिक त्यांचे भविष्य आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना, जी वृद्धापकाळात लोकांची काळजी घेण्यासाठी राबवण्यात येत आहे, ज्याद्वारे दरमहा पेन्शनचा लाभ दिला जातो.
सरकारच्या ही अद्भुत योजना, सध्या प्रत्येकाची मनं जिंकण्यासाठी पुरेशी आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनेत सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींची माहिती असणे आवश्यक आहे. चला या योजनेबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया…
तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
पीएम किसान मानधन योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी :-
भारत सरकारद्वारे चालवली जाणारी पीएम किसान मानधन योजना सध्या सर्वांची मने जिंकत आहे. सरकारच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय १८ आणि कमाल ४० वर्षे असले पाहिजे, यात तुम्हाला वयानुसार गुंतवणूक करावी लागेल.
उदारणार्थ, जर तुम्ही ३० व्या वर्षी या योजनेत जॉईन झाल्यास तुम्हाला मासिक ११० रुपये भरावे लागतील. आणि वयाच्या 40 व्या वर्षापासून दरमहा 220 रुपये प्रीमियम भरावा लागेल. ही प्रक्रिया 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे.
किती पेन्शन मिळू शकेल?
या योजनेत तुम्हाला तुमचे वय ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा पेन्शन मिळेल. वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शनचा लाभ मिळेल, यानुसार, दरवर्षी तुम्हाला ३६,००० रुपये पेन्शन मिळेल.