Pension Scheme : अनेकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात. शिवाय त्यांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. जर तुम्ही एका योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला १ लाख रुपयांची पेन्शन मिळेल.
जर तुम्हाला घरबसल्या १ लाख रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हीही या शानदार योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. काय आहे ही योजना? जाणून घ्या. समजा तुम्ही निवृत्तीचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हे पैसे तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून मिळेल. त्यासाठी तुम्हाला किती बचत आणि गुंतवणूक करावी लागणार आहे ते पहा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समजा आज तुमचे उत्पन्न 50,000 रुपये असेल, 20 वर्षांनंतर दर वर्षी 6% महागाई दराने, ते प्रत्येक महिन्याला 1.6 लाख रुपये होईल. अशा वेळी तुम्हाला पुढील 20 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये पेन्शन मिळण्यासाठी 3.98 कोटी रुपयांच्या निधीची गरज असेल, जी तुम्हाला 20 वर्षांत निवृत्ती नियोजनाद्वारे उभारावी लागणार आहे.
20 वर्षांत 3.98 कोटी रुपये जमा करण्यासाठी, तुम्हाला महिन्याला एकूण 38,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी, तुम्ही 40% डेट फंडात आणि 60% इक्विटीमध्ये गुंतवणूक लागेल. प्रत्येक वर्षी SIP रक्कम ५% वाढवून तुम्हाला इक्विटीमधील गुंतवणूक हळूहळू वाढवावी लागणार आहे.तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये डेटमध्ये आणि 23,000 रुपये इक्विटीमध्ये गुंतवावे लागणार आहेत. ही गुंतवणूक प्रत्येक वर्षी 5% ने वाढली पाहिजे.
20 वर्षांनंतर डेट फंडातून 8% आणि इक्विटीमधून 12% परतावा अपेक्षित असताना, तुम्हाला डेट गुंतवणुकीतून एक दोन लाख नव्हे तर 88 लाख रुपये आणि इक्विटी गुंतवणुकीतून 3.15 कोटी रुपये मिळतात. वयाच्या 60 व्या वर्षी, तुम्हाला एकूण 3.98 कोटी रुपये मिळतील. पुढील 20 वर्षांपर्यंत तुम्हाला प्रत्येक 1 लाखांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते.हे लक्षात घ्या इक्विटीमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे, निवृत्ती नियोजन आणि गुंतवणुकीबाबत तुम्हाला आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा लागेल.