New Business Idea : शून्य रुपये गुंतवणुकीत सुरू करा हे व्यवसाय! कमी वेळेत कमवाल लाखो रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Business Idea: नोकरी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे आता बरेच तरुण आणि तरुणी छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळत आहे. परंतु एखादा व्यवसाय करायचा मनात आल्यानंतर साधारणपणे दोन प्रश्न व्यक्तीच्या मनात उभे राहतात. पहिला म्हणजे व्यवसाय करावा तर कोणता करावा आणि दुसरा म्हणजे व्यवसाय करणे निश्चित झाले परंतु लागणारा पैसा कुठून उभारावा? या दोनच प्रश्नात बरेच जण अडकून पडतात. त्यामुळे मनात केलेला व्यवसाय उभारायचा निर्णय मागे पडतो.

परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल असे अनेक व्यवसाय आहेत की जे तुम्ही फक्त तुमचे डोके लावून करू शकतात आणि भांडवलाचा विषय आज जवळजवळ नाहीत जमा राहतो. म्हणजे लागलं तर एकदम अत्यल्प भांडवल यासाठी तुम्हाला लागू शकते. परंतु या व्यवसायांमध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात इतके क्षमता आहे. अशाच काही व्यवसायांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 शून्य रुपयात सुरू करा हे व्यवसाय

1- इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करण्याचा व्यवसाय प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिकल अप्लाईन्सेस असतात. त्यामध्ये प्रामुख्याने रेफ्रिजरेटर, कुलर तसेच टीव्ही आणि फॅन यासारख्या इलेक्ट्रिकल वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कोणत्याही कंपनीचे किंवा कॉलिटी चे इलेक्ट्रिकल वस्तू असली तरी ती कधी ना कधी खराब होते. त्यामुळे तिला दुरुस्त हे आपल्याला करावेच लागते.

या दृष्टिकोनातून या व्यवसायाला बाजारपेठेत कायमच प्रचंड मागणी राहणार असून  जर तुम्ही रिजनेबल रेटमध्ये चांगले काम करून देत असाल व चांगली सर्व्हिस ग्राहकांना दिली तर नक्कीच हा व्यवसाय तुम्हाला खूप चांगला पैसा देऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नसून फक्त तुम्हाला एखादा इलेक्ट्रिकल वस्तू रिपेरिंग चा कोर्स करणे गरजेचे आहे.

2- ब्रेकफास्ट कॉर्नर( नाश्त्याचे दुकान)- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अगदी थोडेफार भांडवलाची गरज असते. प्रत्येकाला सकाळी नाष्टा करण्याची सवय असते. परंतु बऱ्याचदा कामाच्या घाई गडबडीमध्ये नाश्ता करायचे राहून जाते किंवा बऱ्याचदा सकाळी दररोज कोणता नाश्ता बनवावा हा देखील मोठा प्रश्न बऱ्याचदा पडतो.  या व्यवसायात तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची संधी मिळू शकते. या व्यवसायात जर तुम्हाला चांगले यश मिळवायचे असेल तर तुम्ही फक्त आरोग्यपूर्ण नाश्ता बनवण्यावर जोर देऊ शकतात व ते तुमच्या नाश्ता सेंटरमध्ये विकू शकतात. तसेच बरेच महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत जे तुम्ही नाश्त्यासाठी तुमचा सेंटरवर ठेवू शकता.

3- जुन्या टू व्हीलर आणि कारचा व्यवसाय सध्या कार आणि बाईक यांच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला नवी कार किंवा बाईक घेणे परवडत नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती सेकंड हॅन्ड किंवा जुनी गाडी घेण्याला पसंती देतात. परंतु भरवशाची आणि चांगली कंडिशन असलेली गाडी कुठे मिळेल हे प्रत्येकाला माहीत नसते. त्यामुळे या व्यवसायात संधीचे सोने करू शकता.

तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्याची गरज राहत नाही. त्यामध्ये फक्त तुम्हाला ज्या लोकांना गाड्या विकायच्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो व त्यांची लिस्ट बनवून ठेवायचे असते. त्यामध्ये जर कोणाला गाडी हवी असेल आणि त्याला ती खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोकांशी संपर्क साधून दोघांमधील व्यवहार पार पाडू शकतात आणि त्या माध्यमातून भरपूर कमिशन मिळवू शकतात.

4- जॉब रिक्रुटमेंट सर्विस आजकाल नोकरीची परिस्थिती खूप बिकट झाली असून नोकरी मिळणे दुरापास्त झालेले आहे. या क्षेत्रात देखील तुम्ही अगदी शून्य रुपये भांडवलामध्ये नोकर भरती सेवा अर्थात जॉब रिक्रुटमेंट सर्विस सुरू करू शकता आणि लोकांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करू शकता. याकरिता तुम्हाला फक्त कंपन्यांमधील जे काही एचआर डिपार्टमेंट असते

त्यामध्ये कॉन्टॅक्ट वाढवणे गरजेचे राहिल व वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन त्या कंपन्यांचे मालक व मॅनेजर सोबत तुम्हाला ओळखी वाढवावी लागेल. त्यानंतर संबंधितांना तुमचा व्यवसाय बद्दल माहिती द्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जागा रिक्त आहेत हे माहिती होत जाईल व तुम्ही अनेक गरजू तरुणांना या ठिकाणी नोकरी करिता पाठवू शकता व या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकता.

5- डिजिटल मार्केटिंग कोणत्याही व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये सर्वात महत्त्व हे मार्केटिंगला असते. परंतु आता बदलत्या काळानुसार मार्केटिंग मध्ये देखील बदल होत आहेत. मार्केटिंग देखील आता ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे. प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याला त्याच्या व्यवसायाची जाहिरात ही ऑनलाईन गुगल किंवा फेसबुक या माध्यमातून करायची असते परंतु ती कशी करावी हे प्रत्येकाला माहीत नसते. त्यामुळे तुम्ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता आणि वेगवेगळ्या व्यवसायाची तसेच संस्थेची ऑनलाइन पद्धतीने मार्केटिंग करून देऊ शकता व या माध्यमातून देखील चांगला पैसा तुम्ही मिळवू शकतात.