एसबीआय, बँक ऑफ बडोदा अन एचडीएफसी पैकी कोणती बँक स्वस्तात पर्सनल लोन देते ?

संकटाच्या काळात अचानक पैशांची गरज उद्भवली तर वैयक्तिक कर्जाचा पर्याय सर्वात फायदेशीर ठरतो. मात्र वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेत अधिक असतात. यामुळे फारच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढले पाहिजे अन्यथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची उपलब्धता करावी असा सल्ला जाणकार लोक देतात.दरम्यान आज आपण एसबीआय, एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या तिन्ही बँकांच्या वैयक्तिक कर्जाची तुलना करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
Personal Loan

Personal Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी तुम्ही नक्कीच वाचा. आज आपण देशातील प्रमुख तीन बँकांच्या वैयक्तिक कर्जाची तुलना करणार आहोत. खरंतर देशातील जवळपास सर्वच बँका वैयक्तिक कर्ज ऑफर करतात.

संकटाच्या काळात अचानक पैशांची गरज उद्भवली तर वैयक्तिक कर्जाचा पर्याय सर्वात फायदेशीर ठरतो. मात्र वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेत अधिक असतात.

यामुळे फारच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढले पाहिजे अन्यथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची उपलब्धता करावी असा सल्ला जाणकार लोक देतात.

दरम्यान आज आपण एसबीआय, एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या तिन्ही बँकांच्या वैयक्तिक कर्जाची तुलना करणार आहोत. या तिन्ही बँकांपैकी कोणती बँक स्वस्तात वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.

HDFC बँकेचे वैयक्तिक कर्ज : एचडीएफसी बँक 10.75 टक्के या किमान व्याजदर आपल्या ग्राहकांना पर्सनल लोन देत आहे. मात्र हे व्याजदर ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास आहे अशाच लोकांना लागू होते.

जर समजा एचडीएफसी बँकेच्या या किमान व्याजदरात एखाद्या ग्राहकाला 11 लाख रुपयांचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झाली तर सदर व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 23 हजार 780 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच 14 लाख 26 हजार 800 रुपये सदर व्यक्तीला भरावे लागणार आहेत. अर्थातच तीन लाख 26 हजार आठशे रुपये निव्वळ व्याज म्हणून द्यावे लागतील.

एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्ज : एसबीआय बँक 11.45% या किमान व्याजदर आता सर्वसामान्यांना पर्सनल लोन उपलब्ध करून देते. यासाठी ग्राहकांचा सिबिल स्कोर मात्र चांगला असणे आवश्यक आहे.

जर समजा या व्याजदरात एखाद्या ग्राहकाला 11 लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षासाठी मंजूर झाले तर त्या व्यक्तीला 24164 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत 14 लाख 49 हजार 880 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच व्याज म्हणून तीन लाख 49 हजार 880 रुपये भरावे लागतील.

बँक ऑफ बडोदा : ही बँक आपल्या ग्राहकांना 11.40% या दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. जर समजा या इंटरेस्ट रेट वर एखाद्या ग्राहकाला पाच वर्षे कालावधीसाठी 11 लाख रुपये मिळाले तर त्याला 24 हजार 137 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच सदर ग्राहकाला 14 लाख 48 हजार 220 रुपये भरावे लागतील. म्हणजे निव्वळ व्याज म्हणून तीन लाख 48 हजार 220 रुपये द्यावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe