Personal Loan EMI : तुम्हालाही बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण सर्वात स्वस्त पर्सनल लोन देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. खरं तर आपल्याला अचानक पैशांची गरज भासली की आपण आपल्या मित्र परिवारातून तसेच नातेवाईकांकडून पैसे गोळा करतो.
पण जर पैशांचे ऍडजेस्टमेंट झाली नाही तर बँकेत जातो. इमर्जन्सी मध्ये बँक आपल्याला वैयक्तिक कर्ज ऑफर करते. या वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांपेक्षा अधिक असतात पण बँकेकडून हे कर्ज लवकर आणि सहज मंजूर केले जाते.

अशा प्रकारच्या कर्जाला कोणतीही हमी द्यावी लागत नाही आणि कागदपत्रे सुद्धा कमी लागतात. दरम्यान जर तुम्हीही पर्सनल लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
देशातील जवळपास प्रत्येक सरकारी आणि खाजगी बँक आपल्या ग्राहकांना पर्सनल लोन देते. काही बँका ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्हाला किती व्याज दारात कर्ज मंजूर होणार हे तुमचा क्रेडिट स्कोर, नोकरीची स्थिरता व मासिक उत्पन्नावर आधारित असते.
दरम्यान आज आपण देशातील काही प्रमुख सरकारी आणि खाजगी बँकांच्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदराची माहिती पाहणार आहोत. कोणती बँक ग्राहकांना सर्वात कमी व्याजदरात पर्सनल लोन देत आहे याबाबत आज आपण डिटेल माहिती जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्र – ही बँक ग्राहकांना 9.50% व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. अशा स्थितीत पाच वर्षांसाठी पाच लाखांचे कर्ज घेतल्यास ग्राहकांना दहा हजार 501 रुपयांचा हप्ता भरावा लागणार.
पंजाब अँड सिंध बँक – ही बँक ग्राहकांना 10.35% व्याजदरात वैयक्तिक कर्ज देते. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेकडून प्रोसेसिंग फी म्हणून 0.50% ते 1% शुल्क आकारले जाते.
स्टेट बँक ऑफ इंडिया – बँकेचा व्याजदर 10.30% आहे. पाच लाखांचे कर्ज पाच वर्षांसाठी घेतल्यास दहा हजार 697 रुपयांचा मासिक हप्ता लागेल. कर्जाच्या दीड टक्के प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
एचडीएफसी बँक – कर्जाचा व्याजदर 10.90% आहे. या बँकेकडून 6500 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फी आकारली जाते. पाच लाखांच्या कर्जासाठी दहा हजार 846 रुपयांचा हप्ता भरावा लागणार.