Personal Loans Interest Rates : गृहकर्ज, कार लोन, गोल्ड लोन यासारख्या इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूप महागडे असते. त्यामुळे पर्सनल लोन तेव्हाच घेतले पाहिजे जेव्हा मोठी गरज असते आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो.
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी आपण थोडी माहिती गोळा करणे देखील फार गरजेचे आहे. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकांनी वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्सची तुलना केली पाहिजे जेणेकरून त्यांना चांगली ऑफर मिळू शकेल. पर्सनल कधीही तिथूनच घेतले पाहिजे जिथे व्याजदर कमी व्याज आहे. तुम्ही प्रक्रिया शुल्काचीही तुलना केली पाहिजे.

ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे त्यांना वैयक्तिक कर्जावर योग्य व्याजदर मिळतो. अशातच आज आम्ही अशा 5 बँकांबद्दल बोलणार सांगणार आहोत ज्या वैयक्तिक कर्जावर सर्वात कमी व्याजदर देतात.
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज दर (बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन रेट) देत आहे. यातील कालावधी 84 महिन्यांचा असेल.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया 20 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 किंवा त्याहून अधिक व्याजदर (बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन रेट) देत आहे. येथे कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.
पंजाब आणि सिंध बँक
3 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर बँक 10.15 टक्के ते 12.80 टक्के व्याजदर देत आहे. यातील कालावधी 60 महिन्यांपर्यंत आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा 50 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.35 टक्के ते 17.50 टक्के व्याजदर देत आहे. येथे कालावधी 48 ते 60 महिन्यांपर्यंत आहे.
इंडसइंड बँक
इंडसइंड बँक 30 हजार किंवा त्याहून अधिक आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 32.02 टक्के व्याजदर देत आहे. येथे कार्यकाळ 12 ते 60 महिन्यांपर्यंत आहे.