Petrol Diesel Price Today : आजही वाढल्या किमती ! जाणून घ्या आजचे दर

Published on -

Petrol Diesel Price Today: पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) ची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलचे दर रोज नवनवे उच्चांक गाठत आहे.

रविवारी १७ ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायचं झालं तर काही दिवस सोडले तर इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ होऊन दर १०५.८४ रूपये प्रति लीटर या विक्रमी स्तरावर पोहोचले. तर डिझेलचे दर ९४.२२ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत.

आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 105.84 रुपये आहे. त्याच वेळी, 1 लीटर डिझेल 94.57 रुपये प्रति लिटर आहे.

आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 106.43 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 97.68 रुपये प्रति लिटर आहे.

आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 111.77 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 102.52 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.

आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 103.01 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 98.52 रुपये प्रति लिटर आहे.

असे ठरवतात किंमत –
परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ?
आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन
डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News