PF खात्यातील रकमेवर रिटायरमेंट नंतरही व्याज मिळते का? वाचा सविस्तर

Published on -

PF Account : संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष खास ठरणार आहे. संघटित क्षेत्रात जे कर्मचारी काम करतात त्यांचे पीएफ अकाउंट असते. हे अकाउंट ईपीएफओ द्वारे चालवले जाते. पीएफ अकाउंट मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून 12 टक्के रक्कम जमा केली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगारातून जेवढी रक्कम कट होते तेवढीच रक्कम कंपनी सुद्धा पीएफ अकाउंट मध्ये जमा करते. यामुळे रिटायरमेंट नंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर पीएफ अकाउंट मधील पैसा कर्मचाऱ्यांच्या कामी येतो.

एवढेच नाही तर आपातकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा पीएफ मधील पैसा काढता येतो. लग्नासाठी किंवा मेडिकल एमर्जेंसी, घर बांधण्यासाठी पीएफ अकाउंट मधील पैसा काढण्याची सुविधा इपीएफओकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान पीएफ अकाउंट मधील रकमेबाबत अनेकांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. यातील सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रिटायरमेंट नंतरही पीएफ अकाउंट मधील पैशांवर व्याज मिळते का? तर आज आपण याच प्रश्नांचे उत्तर या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या नियमानुसार रिटायरमेंट नंतर साधारणता तीन वर्ष पीएफ अकाउंट मधील पैशांवर व्याज मिळते.

अर्थात कर्मचारी 58 व्या वर्षी रिटायर झाला तर त्याला 61 वर्षापर्यंत व्याज मिळणार आहे. त्यानंतर मात्र पीएफ अकाउंट निष्क्रिय केले जाते. म्हणजे रिटायर झाल्यानंतर तीन वर्षांनी पीएफ अकाउंट मधील जमा रकमेवर व्याज मिळणार नाही.

यामुळे रिटायर झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत कर्मचाऱ्यांनी पीएफ अकाउंट मधील पैसा काढून घ्यावा आणि तो पैसा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गुंतवायला हवा जेणेकरून त्यांना व्याज मिळत राहील.

आता अनेक मध्येच नोकरी सोडतात मग अशा प्रकरणात काय होते असाही सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की नोकरी सोडल्यानंतरच्या परिस्थितीत सुद्धा रिटायरमेंट सारखेच नियम लागू आहे.

अर्थात जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली तर त्याच्या पीएफ अकाउंट मधील जमा रकमेवर तीन वर्षांपर्यंत व्याज मिळणार आहे. त्यानंतर त्या जमा रकमेवर व्याज मिळणे बंद होणार आहे.

अर्थात नोकरी सोडल्यानंतर तीन वर्ष तुम्ही दुसरी नोकरी स्वीकारली नाही व पैसा तसाच पीएफ अकाउंट मध्ये राहिला तर तीन वर्षानंतर तुमच्या पैशांवर कोणत्याच प्रकारचे व्याज मिळणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe