PF क्लेमची प्रक्रिया आता झटपट, कोट्यवधी EPFO सदस्यांना दिलासा देणारा निर्णय!

EPFO ने PF क्लेम प्रक्रियेत अत्यंत महत्वाचे बदल केले असून आता रद्द चेक किंवा नियोक्त्याच्या पडताळणीशिवाय पैसे काढणे शक्य होणार आहे. यामुळे कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on -

PF Withdrawal | EPFO सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. Provident Fund (PF) खातेधारकांसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठा बदल करत लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. आता PF क्लेम करताना रद्द चेक किंवा बँक खात्याची नियोक्त्याकडून पडताळणी करण्याची गरज नाही. या नव्या नियमांमुळे कोट्यवधी सदस्यांची प्रक्रिया झपाट्याने पूर्ण होणार आहे.

नवीन नियम कोणते?

EPFO ने या प्रक्रियेत जे बदल केले आहेत, त्यामध्ये क्लेम करताना रद्द चेक किंवा पासबुकचा फोटो अपलोड करणे गरजेचे राहणार नाही. याआधी, ऑनलाइन पीएफ काढण्यासाठी सदस्यांना बँकेशी लिंक असलेले चेक किंवा पासबुक अपलोड करावे लागत होते आणि नियोक्त्याकडून त्याची पडताळणी केली जात होती. मात्र, आता हे दोन्ही टप्पे काढून टाकण्यात आले आहेत.

या नव्या प्रणालीमुळे क्लेम प्रक्रियेत लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे सदस्यांना आणि नियोक्त्यांना ‘Ease of Living’ आणि ‘Ease of Doing Business’ चा अनुभव मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे 7 कोटी EPFO सदस्यांना होणार आहे.

काय फायदा होणार?

ही सुविधा 28 मे 2024 पासून काही निवडक केवायसी अपडेट केलेल्या सदस्यांसाठी लागू करण्यात आली होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ही सुविधा सर्व सदस्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान 1.7 कोटींपेक्षा अधिक सदस्यांनी याचा लाभ घेतला आहे.

EPFO च्या या निर्णयामुळे सदस्य आता आधार आधारित OTP द्वारे बँक खात्याचे डिटेल्स अपडेट करू शकतात. त्यासाठी IFSC कोडसह नवीन बँक खात्याची माहिती देता येईल. यामुळे क्लेम प्रक्रिया अधिक जलद आणि विश्वासार्ह झाली आहे. हे सर्व बदल EPFO सदस्यांना पारदर्शकता, वेग आणि सुलभता प्रदान करण्यासाठी केले गेले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe