PF Money : समजा तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या पगारातून प्रत्येक महिन्याला कपात होणाऱ्या भविष्य निर्वाह निधीची माहिती असणे खूप गरजेचे आहे. हे लक्षात घ्या की पीएफ निधी तुमच्या निवृत्तीसाठी बचत म्हणून काम करत असते.
समजा तुमचा पीएफ बनण्यात काही योगदान तुम्ही देत असाल तर तर काही योगदान तुमच्या कंपनीकडून देण्यात येते. परंतु जर तुमचे योगदान नियोक्त्याने दिले नाही तर तुम्ही काय करणार? काळजी करू नका, आता यासाठी ईपीएफओकडून काही नियम देण्यात आले आहेत,
आता कंपनी तुमचा पीएफ जमा करेल. महत्त्वाचे म्हणजे त्या साठी तुम्हाला काही पावले उचलावी लागणार आहेत. ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.
तातडीने करा हे महत्त्वाचे काम
आता तुम्ही सर्वात अगोदर तुमचे ईपीएफ खाते तपासा, त्यामुळे तुम्हाला कंपनीने पाठवलेल्या पैशांची अचूक माहिती मिळेल. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याच्या तपशीलावरून असे पाहायला मिळत आहे की काही महिने पैसे नाहीत. तसेच हे शक्य आहे की तुमच्या नियोक्त्याकडून आवश्यक ती ठेव ठेवण्यात आली नाही.
यासह, तुम्हाला आरामात याबद्दल तक्रार देखील करता येईल. तसेच, कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात पैसे जमा करण्यात कंपन्या अपयशी ठरल्या असल्याच्या बातम्या आहेत. इतकेच नाही तर तुम्ही स्वतः हे पाहिले तर इथे तुम्हाला पीएफ ईपीएफ खात्यात ट्रान्सफर केला नाही, तर आता तुम्ही लवकरच त्याबाबत तक्रार करू शकता.
या ठिकाणी करा तक्रार
कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात पीएफचे पैसे जमा केले जात नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही तक्रार दाखल करण्याचे काम लवकरच करू शकता. तुम्ही EPFIGMS या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्हाला पीएफ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी लागणार आहे. ईपीएफओच्या तक्रार वेबसाइटवर तक्रार नोंदवण्याचा पुरावाही आवश्यक असणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही पगार स्लिप आणि ईपीएफ तपशील देऊ शकता.