शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! फोन पे च्या आयपीओला अखेर मंजुरी मिळाली, कधी येणार 12000 कोटी रुपयांचा आयपीओ?

Published on -

Phonepe IPO : शेअर मार्केटमध्ये अनेक गुंतवणूकदार आयपीओ मध्ये गुंतवणूक करू इच्छितात. बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट करणाऱ्या कंपन्या तसेच ipo कडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते.

तुम्ही सुद्धा आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे फोन पे चा आयपीओ लवकरच गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.

PhonePe आयपीओबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. शेअर बाजार नियामक अर्थातच सेबी कडून याच्या आयपीओला मंजुरी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.

आता ही कंपनी लवकरच अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल करणार आहे. या ipo मध्ये कंपनीचे मूल्य 15 अब्ज डॉलर इतके राहणार आहे.

या ipo च्या माध्यमातून फोन पे कडून तब्बल 12000 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ही आयपीओची चर्चा होते आणि अखेर आता हा आयपीओ प्रस्ताव सेबीच्या मंजुरीच्या पुढे सरकला आहे.

सेबीची मंजुरी मिळाली असल्याने आता लवकरच पुढील देखील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होणार असा विश्वास व्यक्त होतोय. परंतु या आयपीओ मध्ये फक्त ऑफर फॉर सेल या अंतर्गत शेअर्सची विक्री केली जाणार आहे.

अर्थातच फोन पे च्या या आयपीओ मध्ये नवीन शेअर्स जारी होणार नाहीत. विद्यमान गुंतवणूकदार मात्र कंपनीमधील त्यांचे भाग भांडवल विक्री करणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की फोनपे येत्या काही दिवसांत त्यांचे अपडेटेड डीआरएचपी दाखल करणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर फोन पे आयपीओला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

खरंतर या कंपनीने आधीच आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर सादर केलेले आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस कंपनीने गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने सेबीला त्यांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर्स सादर केले होते अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

फोनपे ही जागतिक रिटेल दिग्गज वॉलमार्टच्या मालकीची कंपनी आहे. फोन पे हे देशातील एक लोकप्रिय यूपीआय एप्लीकेशन आहे. या एप्लीकेशनचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe