Physicswallah IPO GMP : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहोत. खरेतर, आज फिजिक्सवाला आयपीओचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच सबस्क्रिप्शनसाठी गुंतवणूकदारांकडे फक्त आजचा दिवस शिल्लक आहे.
हा आयपीओ 11 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. मात्र याकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या आयपीओकडे गुंतवणूकदार फारसे आकर्षित होत नसून यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आमची गुंतवणूक पाण्यात जाणार की काय अशी पण भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. वास्तविक आज शेवटचा दिवस असूनही, दुपारी 1 वाजेपर्यंत फिजिक्सवाला आयपीओ पूर्णपणे सबस्क्रिप्शन झालेला नव्हता. खरंतर या ipo ची जोरदार चर्चा झाली होती.
गुंतवणूकदार याबाबत जाणून घेण्यास मोठे उत्सुक होते. पण याकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवलीये, मग आता अनेकांना गुंतवणूकदार या आयपीओमध्ये इतका कमी रस का दाखवत आहेत ? असा प्रश्न पडला असेल. दरम्यान आज आपण याच बाबतची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
आज फिजिक्सवालाचा इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा शेवटचा दिवस, पण ग्रे मार्केटमध्ये त्याचा आयपीओ जीएमपी अर्थात ग्रे मार्केट प्रीमियम शून्य राहिला आहे. आयपीओ उघडण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 11 नोव्हेंबरला त्याचा जीएमपी प्रति शेअर 1.5 रुपये नोंदवला गेला.
काल, 12 नोव्हेंबर रोजी त्याचा जीएमपी आणखी घसरून फक्त 1.25 रुपये प्रति शेअर झाला. तर आज 13 नोव्हेंबर रोजी IPO बंद होण्याच्या काही तास आधी त्याचा जीएमपी शून्यावर आलाय.
आम्ही जी माहिती देत आहोत ती एक वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याच्या आयपीओला प्रतिसाद का मिळाला नाही? तर याचे मुख्य कारण Byju पण आहे.
फिजिक्सवाला कंपनीचे बिझनेस स्ट्रक्चर हे हुबेहूब बायजू सारखेच आहे. आता Byju ची सद्यस्थिती गुंतवणूकदारांना चांगलीच माहिती आहे. वास्तविक एक काळ असा होता जेव्हा बायजू चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत होता. पण आज त्याची अवस्था बिकट आहे.
कंपनी बंद झालेली नाही, पण ती गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे गुंतवणूकदार फिजिक्सवाला आयपीओकडे फारसे आकर्षित झाले नाहीत. अर्थातच हे एकच कारण नसेल पण Byju ची आर्थिक स्थिती गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.













