Physicswallah Share Price : फिजिक्सवालाचा आयपीओ मोठ्या चर्चेत राहिला. आयपीओ मध्ये निराशा जनक कामगिरीनंतर याच्या शेअरची लिस्टिंग कशी राहणार हा मोठा सवाल होता. मात्र लिस्टिंग मध्ये फिजिक्स वालाच्या शेअर्सने दमदार कामगिरी करून दाखवली आहे.
Edutech क्षेत्रात मोठे नाव बनलेल्या PhysicsWallah कंपनीच्या शेअर्सने मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झालेत आणि या शेअर्सने अगदीच दमदार एंट्री घेतली. स्टॉक एक्सचेंजवरील उपलब्ध माहितीनुसार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर कंपनीचा शेअर इश्यू प्राइस 109 रुपयांपेक्षा तब्बल 33% वर, म्हणजे 145 रुपयांवर लिस्ट झाला.

तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE वर हा शेअर 143.10 रुपयांवर, म्हणजेच 31% वर उघडला. विशेष बाब म्हणजे या शेअर्सने लिस्टिंग नंतर पण धमाकेदार कामगिरी केली आहे.
लिस्टिंगनंतर काही वेळातच शेअरने 162.50 रुपयेचा उच्चांक गाठत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. हा भाव इश्यू प्राइसपेक्षा 40% पेक्षा जास्त वाढ दर्शवत आहे. यामुळे फिजिक्स वाल्याच्या शेअरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून हा स्टॉक पुन्हा फोकस मध्ये आला आहे.
गेल्या आठवड्यात उघडला आयपीओ
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या कंपनीचा कंपनीचा 3,481 कोटी रुपयांचा आयपीओ 11 ते 13 नोव्हेंबरदरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला होता. यात 3,100.71 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 380 कोटींचा OFS समाविष्ट होता.
दरम्यान, 14 नोव्हेंबर रोजी अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण झाली. लिस्टिंगपूर्वी, 10 नोव्हेंबरला कंपनीने 1,563 कोटी रुपये एंकर गुंतवणूकदारांकडून उभारले, ज्यातून संस्थात्मक गुंतवणूकदारांचा मजबूत विश्वास दिसून आला.
एंकर बुकमधील शेअर्सवर मिड-डिसेंबर आणि मिड-फेब्रुवारीपर्यंत लॉक-इन राहणार आहे. सब्सक्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी आयपीओला एकूण 1.92 पट मागणी मिळाली. यात QIB सेगमेंटने 2.86 पट सब्सक्रिप्शन देत मोठा वाटा उचलला.
रिटेल गुंतवणूकदारांकडून 1.14 पट मागणी आली. मात्र NII सेगमेंटमध्ये फक्त 0.51 पट सब्सक्रिप्शन मिळाले. कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्याला 3.71 पट प्रतिसाद मिळाला, कारण त्यांना प्रति शेअर 10 रुपयांची सवलत देण्यात आली होती.
कशी सुरू झाली फिजिक्सवाला कंपनी?
फिजिक्सवाला कंपनीचे मॉडेल बायजु सारखेच आहे. ही कंपनी अलख पांडे यांनी स्थापन केली होती. PhysicsWallah आज देशातील अग्रगण्य Edutech कंपन्यांपैकी एक आहे. दरम्यान बायजुची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात फारच चिंताजनक बनलेली आहे.
यामुळे फिजिक्स वाल्याच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण आयपीओ नंतर कंपनीचे शेअर चांगली कामगिरी करत आहेत. कंपनीच्या शेअरची दमदार लिस्टिंग झाली आहे.
30 जून 2025 पर्यंत कंपनीकडे 4.13 दशलक्ष ऑनलाइन यूजर्स, 0.33 दशलक्ष ऑफलाइन विद्यार्थी, 303 हायब्रिड/फिजिकल सेंटर्स आणि 13.7 दशलक्ष YouTube सब्सक्राइबर्स होते. FY 2025 मध्ये कंपनीचा महसूल 51% वाढून 3,039 कोटी झाला. नेट लॉस घटून 243 कोटी, तर EBITDA पहिल्यांदाच पॉझिटिव्ह होत 193.20 कोटी झाला.













