PNB Account Benefits : PNB ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन सुविधा घेऊन येत असते. ज्यामुळे ग्राहकांना त्याचा खूप मोठा फायदा होतो. जर तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
या बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांना आता एक दोन लाख नाही तर एकूण 20 लाखांचा फायदा होणार आहे. याचा लाभ आता तुम्हीही घेऊ शकतो. परंतु अनेकांना या सुविधेबद्दल माहिती नाही. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही.

पीएनबी माय सॅलरी अकाउंट
पंजाब नॅशनल बँकेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर पीएनबी माय सॅलरी अकाउंटची माहिती देण्यात आली आहे. या खात्यामध्ये बँकेच्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येईल. तसेच स्वीप मारण्याची देखील सुविधा मिळत आहे. इतकेच नाही तर या ग्राहकांना अपघात विम्याचा देखील लाभ घेता येतो.
मिळेल 20 लाख रुपयांचा लाभ
आता जर तुम्ही देखील या बँकेमध्ये तुमचे पगार खाते चालू केले तर तुम्हाला 20 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात संरक्षण देण्यात येते. जर समजा एखाद्या ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला एक दोन हजार नाही तर एकूण 20 लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण मिळते.
चार श्रेणींमध्ये चालू करता खाते
- आता तुम्हाला 10,000 रुपये ते 25,000 रुपयांपर्यंतच्या पगारावर सिल्व्हर खाते चालू करता येईल. या खात्यात 50 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट करण्याची सुविधा मिळते.
- तसेच आता तुम्ही 25001 रुपये ते 75000 रुपये मासिक पगारावर गोल्ड अकाउंट चालू करू शकता. या खात्यामध्ये 1,50,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- इतकेच नाही तर तुम्ही 75001 रुपये ते 150000 रुपयांपर्यंतच्या मासिक पगारावर प्रीमियम खाते चालू करता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे या खात्यावर २.२५ लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात आहे.
- आता तुम्हाला 150,001 रुपयांपेक्षा जास्त पगारासह प्लॅटिनम खाते उघडता येऊ शकते. या खात्यावर 3,00,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात आली आहे.