पोस्टाची ‘ही’ योजना 2 वर्षात तुमच्या पत्नीला बनवेल श्रीमंत! व्याजाने जमा होईल भरपूर पैसा

गेल्या काही वर्षापासून गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी लोकप्रिय ठरताना दिसून येत आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात व यामध्ये लहान बचत योजनांपासून मुदत ठेव योजनांचा देखील आपल्याला समावेश करता येईल.

Ratnakar Ashok Patil
Published:
post office

Post Office:- गेल्या काही वर्षापासून गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी लोकप्रिय ठरताना दिसून येत आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात व यामध्ये लहान बचत योजनांपासून मुदत ठेव योजनांचा देखील आपल्याला समावेश करता येईल.

पोस्टाच्या या सगळ्या योजनांमध्ये जर आपण खास महिलांसाठी असलेली एक योजना बघितली तर गुंतवणुकीद्वारे महिलांना चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय फायद्याची आहे. नेमकी पोस्टाची ही महत्त्वपूर्ण योजना कोणती आहे आणि महिलांना त्याच्या कसा लाभ मिळतो? याबद्दलची माहिती बघू.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांसाठी आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना फक्त महिलांसाठी असून महिलांनी जर यामध्ये गुंतवणूक केली तर बाजाराच्या कुठल्याही जोखमीचा त्यांना सामना करावा लागत नाही व हमखास परतावा मिळतो.

या योजनेअंतर्गत महिला दोन वर्षांकरिता जास्तीत जास्त दोन लाख रुपये या योजनेत जमा करू शकता व दोन वर्षातील गुंतवणुकीवर या योजनेत 7.5% दराने निश्चित व्याज मिळते.

करात देखील मिळते सवलत
महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये महिलांनी जमा केलेल्या पैशांवर सरकारच्या माध्यमातून कर सवलत देखील देण्यात येते. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केली तर सर्व महिलांना कर सवलतीचा फायदा मिळतो. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुली देखील खाते उघडू शकतात.

कसा मिळेल 31 हजार 125 रुपये व्याजाचा फायदा?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत दोन वर्षाच्या कालावधी करिता 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. तुम्ही दोन लाख रुपये जरी या योजनेत गुंतवले तर पहिल्या वर्षी 15 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 16,125 रुपयाचा परतावा तुम्हाला मिळतो.

म्हणजे दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दोन वर्षाचा मिळणारा एकूण व्याज परतावा हा एकूण 31 हजार 125 रुपये इतका मिळतो. अशा पद्धतीने दोन वर्षाच्या कालावधीतच महिलांना उत्तम प्रकारे पैसा कमावण्याची संधी या योजनेतून मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe