Post Office FD : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, फक्त एक वेळच्या गुंतवणुकीवर मिळवा मोठी रक्कम !

Content Team
Published:
Post Office FD

Post Office FD : प्रत्येक व्यक्तीला आज गुंतवणूक करायची आहे. पण बाजारात सध्या इतक्या योजना आहेत की त्यापैकी एक निवडणे फार कठीण होऊन बसले आहे. पण जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला सुरक्षेसह उत्तम परतावा मिळेल.

आम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेबद्दल बोलत आहोत, जिथे तुम्ही एकदा पैसे गुंतवून नियमित परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमचे अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्ही अगदी कमी पैशात गुंतवणूक करू शकता. तसेच येथे मिळणार व्याजदर हा ६.९ टक्के ते ७.५ टक्के आहे.

TD योजनेमध्ये, गुंतवणूकदारांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. या योजनेत तुम्ही १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस टीडी योजनेअंतर्गत कोणताही नागरिक आपले खाते उघडू शकतो. एवढेच नाही तर 3 प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने खाते उघडता येते. किमान गुंतवणुकीची रक्कम सुमारे 1,000 आहे.

किती व्याज मिळेल?

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीममध्ये एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला ६.९ टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास ७ टक्के व्याज मिळेल. तुम्ही 3 वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला 7.10 टक्के व्याज मिळेल आणि 5 वर्षांसाठी तुम्हाला TD स्कीममध्ये 7.5 टक्के व्याज मिळेल.

कर सवलतीचा लाभ !

तुम्ही TD योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी खाते उघडू शकता. यासोबतच यामध्ये आयकर सवलतही मिळते. तथापि, अल्प मुदतीच्या ठेवींवर कर लाभ दिला जात नाही. टीडी स्कीममध्ये मुदतपूर्तीपूर्वीही पैसे काढता येतात. यासोबतच दंडही आकारला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe