Post Office Rule Change : छोट्या बचतीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये खाते चालू करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो आणि कोणतीही जोखीम त्यांना घ्यावी लागत नाही. बदलत्या काळानुसार पोस्टातील सुविधांमध्ये देखील खूप सुधारणा होत आहे.
अनेकवेळा खात्यासंदर्भातील अनेक नियम देखील पोस्टाकडून बदल केले जातात. हे लक्षात ठेवा की बँकांप्रमाणेच आता पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्येही मिनीमम बॅलेन्स मेंटेन असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक नसेल तर 100 रुपये तुमच्या खात्यातून कापले जातील.
पोस्ट ऑफिसनं बचत खात्यातील कमीत कमी रक्कम 50 रुपयांवरून 500 रुपये इतकी केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात 500 रुपये असावे. त्यामुळं तुमच्या खात्यात 500 रुपये नसतील तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्यांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत. त्यापैकी अशा काही योजना आहेत की ज्या पाच वर्षांत परिपक्व होतात.परंतु पोस्ट ऑफिसने काही नियमात बदल केले आहेत. जाणून घ्या सविस्तर.
खात्यातून पैसे काढणे
सरकारने आता खाते अर्जातून पैसे काढण्याची पद्धत फॉर्म 2 वरून फॉर्म 3 मध्ये महत्त्वाचा बदल केला आहे, ज्या अंतर्गत पासबुक दाखवून खात्यातून गुंतवणूकदाराला कमीत कमी पन्नास रुपयांची रक्कम काढता येईल.
खातेदारांच्या संख्येमध्ये केला बदल
पूर्वी पोस्ट ऑफिस बचत खात्यात संयुक्त खातेदारांची संख्या दोन होती. त्यात आता बदल केला आहे. ही संख्या आता दोनवरून तीन झाली आहे.
खात्यातील ठेवींमध्ये मिळणारे व्याज
जर 10 व्या दिवसापासून आणि महिन्याच्या अखेरीस खात्यातील सर्वात कमी शिल्लक असेल तर वार्षिक 4% दराने व्याज आकारण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे व्याज प्रत्येक वर्षाच्या शेवटी मोजण्यात येईल. आणि ते खातेदाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. समजा जर या अंतर्गत, एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या खात्यातील व्याज केवळ त्या महिन्याच्या शेवटी दिले देण्यात येईल.