म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज

Published on -

Post Office Saving Scheme : पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. म्हातारपणात सगळ्यांना पैशांची अडचण भासते. उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांवर अवलंबून राहावे लागते. जर समजा मुलं नसतील तर अशा प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.

आर्थिक अडचणींमुळे उतार वयातही संकटाचा सामना करावा लागतो. उतार वयात दवाखान्याचा खर्चही प्रचंड वाढतो. अशा स्थितीत अनेक जण बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन बनवतात. काही लोक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात.

दरम्यान जर तुम्हालाही उतार वयात एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती सांगणार आहोत जिथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला उतार वयात 20 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळणार आहे.

महिन्याकाठी 20 हजार रुपयांचे व्याज मिळाल्यास म्हातारपणातही पैशांची तंगी भासणार नाही. पोस्टाची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करता येते.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2% दराने व्याज दिले जात आहे. सिंगल तसेच जॉइंट अकाउंट ओपन करण्याची मुभा देखील मिळते. या योजनेत सिंगल अकाउंट ओपन केल्यास तीस लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट करता येते. त्याचवेळी जॉईंट अकाउंट ओपन केल्यानंतर 60 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते.

यामध्ये किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येणे शक्य आहे. ही योजना पाच वर्षांची असून योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत तीन वर्ष कालावधी वाढवता येतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळणारे व्याज प्रत्येक तीन महिन्यांनी तुमच्या पोस्टाच्या किंवा इतर बँक अकाउंट मध्ये जमा होते.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ती रक्कम परत गुंतवू सुद्धा शकता. समजा तुम्ही 10 लाख 7 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 8.2% व्याजदराने पाच वर्षांच्या काळात चार लाख 12 हजार 870 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे पाच वर्षानंतर मुद्दल आणि व्याज असे एकूण 14 लाख 19 हजार 870 रुपये मिळतील.

म्हणजेच तुम्हाला दरमहा 6 हजार 882 रुपयांचे व्याज मिळणार आहे. त्याचवेळी जर तुम्ही या योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षांच्या काळात बारा लाख तीस हजार रुपये व्याज मिळणार आहे.

म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला वीस हजार पाचशे रुपयांचे व्याज मिळेल. तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यांनी 61 हजार पाचशे रुपयांचे व्याज दिले जाणार आहे. हे व्याज तुमच्या बचत खात्यामध्ये वर्ग होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News