Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सरकारी योजना आहेत. ज्याचा लाभ घेऊन लोक श्रीमंत होत आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका छोट्या बचत योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये खाते उघडून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती योजना म्हणजे आवर्ती ठेव.
यामध्ये फार कमी गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम कमवू शकता. यामध्ये तुम्हाला सरकारकडून ६.७ टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत दरमहा 5,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती फायदा होईल चला जाणून घेऊया…
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममधील गुंतवणुकीवर तुम्हाला ६.७ टक्के परतावा मिळेल. सरकारने हा व्याजदर १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू केला आहे.
या योजनेत तुम्हाला तिमाही आधारावर व्याज दिले जाते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यात फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता यावर कोणतीही मर्यादा नाही .
मासिक 5,000 रुपये गुंतवल्यास किती फायदा होईल?
तुम्ही या योजनेत मासिक 5,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही मॅच्युरिटीवर 3 लाख रुपये जमा करू शकता. यावर तुमचे ६.७ टक्के व्याज ५६८३० रुपये डोले. अशा प्रकारे तुम्हाला 3 लाख 56 हजार 830 रुपयांचा नफा मिळेल.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुमची गुंतवणूक आणखी 5 वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला बंपर उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे तुम्ही पुढील 10 वर्षात 6 लाख रुपये कमवाल. यामध्ये 2 लाख 54 हजार 272 रुपयांचे उत्पन्न आणि 8 लाख 54 हजार 272 रुपयांचे व्याज उत्पन्न असेल.