Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्याकडील पैसे दुप्पट करायचे आहेत का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एका सुरक्षित बचत योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर, अनेकांना आपल्याकडील पैसे दुप्पट करायचे आहेत पण यासाठी त्यांना सुरक्षित पर्याय हवे असतात.
सुरक्षित पर्यायांच्या शोधात अनेकजण बँकांच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे मात्र येथे केलेली गुंतवणूक ही थोडीशी जोखीमपूर्ण असल्याने आजही अनेकजण पोस्टाच्या बचत योजनांना प्राधान्य देतात.

शेअर मार्केट मधील अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना दुप्पट रिटर्न मिळवून देत आहेत. पण आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जी की आपल्या गुंतवणूकदारांना निश्चित परतावा देते आणि या योजनेत गुंतवलेले पैसे सुद्धा काही कालावधीनंतर दुप्पट होतात.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना. या योजनेचे नाव शेतकऱ्यांवरून आहे परंतु या योजनेत सगळेजण गुंतवणूक करू शकतात. कोणताही भारतीय गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि चांगले रिटर्न मिळवू शकतो.
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रात जॉइंट अकाउंट ओपन करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सद्यस्थितीला 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेचे अकाउंट तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा सार्वजनिक बँकेत जाऊन ओपन करू शकता. दीर्घकालीन बचत आणि सुरक्षित गुंतवणूक या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
सुरुवातीला ही योजना 1988 मध्ये सुरू झाली होती आणि त्यानंतर 2014 मध्ये ही योजना पुन्हा लाँच करण्यात आली. या योजनेला सरकारचे पूर्ण समर्थन असते म्हणजेच योजनेत गुंतवलेले पैसे वाया जात नाहीत. योजना 9 वर्ष आणि सात महिन्यांमध्ये अर्थात 115 महिन्यांमध्ये परिपक्व होते.
या योजनेत गुंतवणूक केल्यास 115 महिन्यानंतर गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट होतात. अर्थात जर आज रोजी या योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर 115 महिन्यांनी ही इन्व्हेस्टमेंट 10 लाख रुपयांची होणार आहे. अर्थातच पाच लाख रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.