Post Office Scheme: लोकांना आर्थिक फायदा प्राप्त करून देण्यासाठी आज सरकार अनेक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये मोठे बदल करत आहे. ज्याचा फायदा देखील लोकांना होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला या लेखात पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत.
ज्याच्या फायदा घेत तुम्ही भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेत गुंतवणूकदारांना जमा केलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा मिळतो. चला मग जाणून घेऊया या योनजेंबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही या लेखात तुम्हाला पोस्ट ऑफिसची लोकप्रिय योजना किसान विकास पत्र योजनाबद्दल माहिती देत आहोत. तुम्हाला या योजनेत फक्त 1000 मध्ये खाते उघडता येते. तुम्हालाही दुप्पट नफा मिळवायचा असेल तर तुम्ही यासाठी खाते उघडू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये एकदा खाते उघडल्यानंतर, एखाद्याला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. याचा अर्थ गुंतवणूकदार त्याच्या इच्छेनुसार रक्कम जमा करू शकतो. योग्य रणनीतीने पैसे जमा केले तर ही योजना एखाद्या व्यक्तीला करोडपती देखील बनवू शकते.
सरकारने किसान विकास पत्रामध्ये एप्रिल ते जून 2023 या तिमाहीचे व्याजदर जाहीर केले आहेत. व्याजदरात 30 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 7.5 टक्क्यांवर पोहोचले आहेत. व्याजदर चक्रवाढीच्या आधारावर मोजले जातात. त्यानुसार, 120 महिन्यांत दुप्पट होणारी रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होईल. याशिवाय योजनेची परिपक्वता 120 महिन्यांवरून 115 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. आता पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागेल. योजनेसाठी खाते उघडणे आणि बंद करणे खूप सोपे आहे. यासोबतच करमाफीची सुविधाही उपलब्ध आहे.
(अस्वीकरण: या लेखाचा उद्देश फक्त माहिती शेअर करणे आहे. आम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही.)
हे पण वाचा :- Viral Messages : काय सांगता ! सरकार देत आहे 239 रुपयांचे फ्री रिचार्ज ; जाणून घ्या सर्वकाही ..