पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करून 65 लाख रुपयांचे व्याज मिळवा ! 

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. या वर्षात रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आणि रेपो रेट मध्ये एक टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले.

यामुळे एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मुदत ठेव योजनेतील गुंतवणुकीचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आता गुंतवणूकदार मुदत ठेव योजनेच्या ऐवजी इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दाखवत आहेत.

तर काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे. पण जर तुम्हाला शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना देखील फायदेशीर ठरणार आहेत.

दरम्यान आज आपण अशा एका सरकारी क्वचित योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे तुम्ही दररोज 416 रुपये यांची गुंतवणूक करून फक्त व्याजातूनच 65 लाख रुपयांची कमाई करू शकणार आहात. 

कोणती आहे ती योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही योजना पंधरा वर्षांची असून यामध्ये गुंतवणूकदारांना चांगले व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे व्याज हे टॅक्स फ्री सुद्धा आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना अर्थातच पीपीएफ योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतचा पैसा गुंतवता येतो. ही गुंतवणूक आयकर विभागाच्या कलम 80 C अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या योजनेत प्रत्येक महिन्याला 12500 म्हणजेच दररोज 416 रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांनी एक मोठा फंड तयार होतो. विशेष म्हणजे योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना याचा कालावधी वाढवता येतो. दरम्यान जर गुंतवणूकदारांनी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत एकूण 25 वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवली तर त्यांना 1.03 कोटी रुपये मिळणार आहेत.

यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक 37.05 लाख एवढी असेल. तसेच 65.5 लाख गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. एकंदरीत या योजनेत लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe