Post office scheme for women : पोस्ट ऑफिसकडून प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी उत्तम योजना राबवल्या जात आहेत. देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी बनवण्यासाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
अशातच महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना देखील सुरू केली होती. नावाप्रमाणेच ही योजना खास महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सुरु करण्यात आली आहे. सरकारकडून मुलींसाठी आणखी आयोजन चालवली जाते, ती म्हणजे सुकन्या समृद्धि योजना, येथे 10 वर्षांच्या मुलीच्या नावाने गुंतवणूक करणात येते, या दोन्ही योजनांचा परतावा सर्वाधिक आहे, चला या योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

महिला बचत प्रमाणपत्र योजना काय आहे?
कोणत्याही वयोगटातील महिला या सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकतात आणि या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची रक्कम 2 लाख रुपये आहे. तुम्ही या योजनेत 2 वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला 7.50 टक्के निश्चित व्याज मिळते.
या योजनेअंतर्गत, आयकर कलम 80C अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. तुम्ही या योजनेत 2 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 232044 लाख रुपये मिळतील.
SSY योजना काय आहे?
मोदी सरकारने मुलींसाठी SSY योजना आणली होती. विशेषतः महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या 10 वर्षांच्या मुलीसाठी SSY योजना खाते उघडू शकता आणि दरवर्षी 250 ते 1.5 लाख रुपये गुंतवू शकता आणि भरपूर परतावा मिळवू शकता.
मुलीच्या नावाने चालवल्या जाणार्या योजनेअंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकते. वयाच्या २१ व्या वर्षी संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या तणावातून मुक्त व्हाल. या योजनेंतर्गत जमा रकमेवर ८ टक्के व्याज मिळत आहे.
MSASC की SSY कोणती अधिक फायदेशीर?
MSASC आणि SSY या दोन्ही योजना महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केल्या आहेत. तरी हे लक्षात घेण्यासारखे असेल की एमएसएससी ही एक लहान बचत योजना आहे.
तर SSY ही दीर्घकालीन बचत योजना आहे. SSY खात्यात गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाच्या तणावातून मुक्त व्हाल. तर स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही जास्त परतावा मिळवण्यासाठी MSSC खात्यात गुंतवणूक करू शकता.