Post office scheme : आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेकांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते, ज्या ठिकाणी त्यांचा पैसाही सुरक्षित असेल तसेच जबरदस्त परतावाही मिळेल. गुंतवणूकदारांना जर प्रत्येक महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.
विशेष म्हणजे या योजनेत तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. तुम्हाला या योजनेत प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर तुम्हाला या योजनेत चांगली कमाई करता येईल.
समजा तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर 5 वर्षांत सुमारे 71 हजार रुपयांचा निधी तुम्हाला मिळेल. यात जमा करण्यात आलेल्या रकमेवर 60 हजार रुपये आणि सुमारे 11 हजार रुपये व्याज मिळू शकेल. परंतु हा आरडी 5 वर्षांसाठी वाढवला तर एकूण 10 वर्षात 1.69 लाख रुपयांचा निधी तयार होईल. तर तुमची ठेव रक्कम 1.20 लाख रुपये इतकी असेल. तुम्हाला त्यात एकूण 49 हजार रुपयांचे व्याज मिळेल.
तुम्ही आरडी योजना 5 वर्षांसाठी वाढवली तर 15 वर्षांत 3.04 लाख रुपयांचा निधी मिळेल.इतकी या टप्प्यावर तुमची ठेव रक्कम 1.80 लाख रुपये असेल. तसेच तुम्हाला सुमारे 1.24 लाख रुपये व्याज मिळतील. ही योजना 5 वर्षांसाठी वाढवल्यास 20 वर्षात 4.91 लाख रुपयांचा निधी तयार होईल. या टप्प्यावर तुमची ठेव रक्कम 2.40 लाख रुपये असेल. तुम्हाला एकूण 2.51 लाख रुपये व्याजाचे मिळतील.
ही आरडी योजना 5 वर्षांसाठी वाढवली तर 25 वर्षांत 7.49 लाख रुपयांचा निधी तयार होईल. यावेळी तुमची ठेव रक्कम 3 लाख रुपये इतकी असणार आहे. तुम्हाला व्याज म्हणून एकूण 4.48 लाख रुपये मिळू शकतात. ही आरडी योजना 5 वर्षांसाठी वाढवली तर 30 वर्षांत 11.04 लाख रुपयांचा निधी जमा होईल. तर यावेळी ठेवीची रक्कम 3.60 लाख रुपये असेल तुम्हाला सुमारे 7.44 लाख रुपये व्याज म्हणून मिळू शकतात.
अशा प्रकारे, जर तुम्ही 1000 रुपयांची आरडी योजना दीर्घकाळ चालविली तर एक फंड तयार होईल. तसेच जमा करण्यात आलेल्या पैशातून जवळपास दुप्पट व्याजही तुम्हाला मिळू शकते.