Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची आकर्षक योजना! घरबसल्या मिळवा 8 लाखांचा परतावा, कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : देशात जोखीमेशिवाय आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या अनेक योजना लोकप्रिय आहेत. परंतु मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा जर तुम्हाला असेल तर पोस्ट ऑफिसमधील बचत योजना खूप फायदेशीर ठरतात.

या योजनांमध्ये तुम्हाला आकर्षक व्याज मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर सुरक्षेची तर हमी मिळतेच मिळते परंतु कर सवलतीचा लाभ ही मिळतो. अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना आहे ज्यात तुम्हाला जबरदस्त परतावा मिळत आहे.

आता तुम्हीही या योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या जबरदस्त योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र योजना, जी अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. समजा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तर सर्वात अगोदर तुम्हाला यामध्ये काही गुंतवणूक करावी लागणार आहे, त्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे

जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी किसान विकास पत्र योजना अनेकांची मने जिंकत आहे. यात लोकांना बंपर नफा मिळत आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी खाते उघडावे लागणार आहे. या योजनेत देशातील नागरिक केवळ 1000 रुपये गुंतवून खाते चालू करू शकतात. तसेच ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानली जाते.

तसेच या योजनेमध्ये आकर्षक व्याज देण्याचे कामही करण्यात येत आहे. जर तुम्ही या योजनेत योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे मिळतील. यामध्ये तुम्हाला 7.5 टक्के व्याजाचा लाभ दिला जात आहे. या योजनेतील गुंतवणुकीची कमीत कमी रक्कम 1000 रुपये निश्चित केली आहे.

किती मिळेल परतावा

तुम्हाला या किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणुकीमुळे दुप्पट परतावा सहज मिळतो. 9 वर्षे आणि 7 महिन्यांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर, मुदतपूर्ती दरम्यान दुप्पट परताव्यांचा लाभ सहज उपलब्ध होतो. समजा एखाद्या व्यक्तीने एकदा 4 लाख रुपये गुंतवल्यास तर 115 महिन्यांनंतर 8 लाख रुपयांचा फायदा आरामात मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe