Post Office Sheme:- गुंतवणुकीसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्यायाची निवड अतिशय महत्त्वाची ठरते. कारण आपण कष्टाने मिळवलेला पैसा सुरक्षित रहावा आणि त्याच्या गुंतवणुकीपासून आपल्याला चांगला परतावा मिळावा ही अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते व याकरिताच प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी याच प्रकारे तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर तुमच्याकरिता पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप फायद्याच्या ठरतील. कारण या यामधील गुंतवणूक सुरक्षित असतेच परंतु तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो. चला तर मग या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेची माहिती बघणार आहोत जी गुंतवणुकीसाठी चांगली योजना तर आहेच परंतु तुम्हाला परतावा देखील या माध्यमातून चांगला मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट अर्थात TD योजनेचे स्वरूप
तुम्हाला जर एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिसची एफडी योजना अतिशय फायद्याच्या असून या योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच भरपूर व्याज मिळत आहे. रिझर्व बँकेने अलीकडेच रेपो रेटमध्ये कपात केली. परंतु त्याचा परिणाम पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांच्या व्याजदरांवर मात्र झालेला नाही. पोस्ट ऑफिसच्या ज्या काही मुदत ठेव म्हणजेच एफडी योजना आहे त्या टाईम डिपॉझिट योजना म्हणून देखील ओळखल्या जातात. पोस्ट ऑफिसची ही योजना बँक एफडी योजनेसारखेच असून अगदी बँकेत तुम्ही जर एफडी केली तर त्याप्रमाणेच तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या टीडी योजनेत विशिष्ट कालावधीत निश्चित परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ग्राहकांना एक वर्ष, दोन वर्ष, तीन आणि पाच वर्षांकरिता टीडी खाते उघडता येते. या योजनेत गुंतवणूक केली तर कालावधीनुसार मिळणारा व्याजदर वेगवेगळा आहे. एक वर्ष गुंतवणूक केली तर 6.9%, दोन वर्षासाठी 7 टक्के, तीन वर्षासाठी 7.1% आणि पाच वर्षासाठी 7.5% इतका व्याजदर सध्या मिळत आहे.

एक लाखाची गुंतवणूक केली तर किती व्याज मिळेल?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक यापैकी कोणीही गुंतवणूक केली तरी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत समान पद्धतीने व्याज मिळते. समजा तुम्ही दोन वर्षांसाठी जर या योजनेमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला यावर दोन वर्षात 14 हजार 888 रुपये व्याज मिळते. म्हणजे तुमची एकूण जमा रक्कम एक लाख 14 हजार 888 रुपये होते. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सुरक्षित गुंतवणुकीतून 1 लाखावर 14888 रुपये व्याज मिळवू शकतात.