Share Market नाही तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत सुद्धा पैसे डबल होतात ! 1 लाखाचे दोन लाख बनवण्याचा सोपा फॉर्म्युला

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. ज्यांना पोस्टाच्या बचत योजनेत पैसा गुंतवायचा आहे त्यांच्यासाठी नक्की आजचा हा लेख फायद्याचा राहील. खरे तर गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. कधी शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न मिळतात तर कधी त्यांचे नुकसानही होते.

शेअर मार्केटच्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. त्यामुळे अनेकांनी शेअर मार्केट मधून पैसे काढून घेतले आहेत. दरम्यान जर तुमचाही शेअर मार्केट मधून मोहभंग झाला असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही पोस्टाच्या एका भन्नाट बचत योजनेची माहिती घेऊन आलो आहोत.

आज आपण ज्या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत तिथे गुंतवणूकदारांचे पैसे 100% दुप्पट होतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळतो. पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या योजनेत देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो.

सुरुवातीला ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू झाली होती पण नंतर या योजनेची व्यापकता वाढली. आज रोजी या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होतात. 115 महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे डबल होतील.

यात किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराकडे जेवढे पैसे असतील तो यात गुंतवू शकतो म्हणजेच कमाल मर्यादा सेट झालेली नाही. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.5% दराने व्याज दिले जात आहे. यात गुंतवणूक करणाऱ्यांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो म्हणून पैसे वेगाने वाढतात.

यातील गुंतवणूकदारांचे पैसे हे 115 महिन्यांनी म्हणजेच नऊ वर्ष आणि सात महिन्यांनी दुप्पट होतात. या योजनेत गुंतवणूकदारांनी 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 115 महिन्यांनी गुंतवणूकदाराची रक्कम 50 हजार रुपये होणार आहे. ही योजना 115 महिन्यांमध्ये परिपक्व होते.

पण गुंतवणूकदारांना वेळेआधी सुद्धा पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याचे काही विशिष्ट नियम आहेत. गुंतवणूक सुरू केल्यानंतर अडीच वर्षांनी या योजनेतून पैसे काढता येतात.

परंतु अशा प्रकरणात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार नाहीत. जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर मॅच्युरिटी पर्यंत तुम्हाला तुमचा पैसा तसाच होल्ड करून ठेवावा लागणार आहे.

जर तुम्ही या योजनेत आज रोजी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 115 महिन्यांनी म्हणजेच नऊ वर्ष आणि सात महिन्यांनी दोन लाख रुपये मिळणार आहेत. अर्थातच तुम्हाला एक लाख रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe