पोस्ट ऑफिस च्या ‘या’ योजनेत दररोज 50 रुपये गुंतवलेत तर मॅच्युरिटीवर मिळणार 30 लाख रुपये ! कोणती आहे ही योजना?

Post Office Scheme : भारतात आजही अनेक जण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. याशिवाय काही लोक पोस्टाच्या बचत योजनांमध्ये देखील गुंतवणूक करतात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.

या योजनेत दिवसाला 50 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच महिन्याकाठी पंधराशे रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर अर्थातच योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तब्बल 30 लाख रुपये मिळणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती.

कोणती आहे ती योजना

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक योजना आहे ग्राम सुरक्षा योजना. ग्राम सुरक्षा योजना ही केवळ बचत योजना नाही तर आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी सुद्धा आहे.

देशातील ग्रामीण भागातील लोकांना डोळ्यापुढे ठेवून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 1995 मध्ये सुरू झाली आहे. तेव्हापासून आजतागायत ही योजना सुरू आहे. 19 वर्षांपासून ते 55 वर्षे वयोगटातील नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

या योजनेसाठी प्रीमियम भरण्याचे अनेक पर्याय आहेत. यात तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता. तसेच दर तीन महिन्यांतून एकदा, दर 6 महिन्यांतून एकदा, वर्षातून एकदा प्रीमियम भरण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 55 वर्षे, 58 वर्षे आणि 60 वर्षाचा आहे. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांचा प्रीमियम निवडला, तर तो 55 वर्षांचा होईपर्यंत त्याला दरमहा 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

म्हणजे दररोज पन्नास रुपयांची गुंतवणूक त्याला करावी लागणार आहे. जर त्याला 58 वर्षे गुंतवणूक करायची असेल तर त्याला दरमहा 1,463 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच, 60 वर्षांसाठी 1,411 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.

तुम्ही या योजनेत 19 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला 31.60 लाख रुपयांचा परतावा मिळणार आहे. जर तुम्ही 19 वर्षांपासून ते 58 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला 33.40 लाख रुपये मिळतील.

19 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला 34.60 लाख रुपये मिळणार आहेत. पॉलिसीधारकाचा मध्येच मृत्यू झाला तर तोपर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या आधारे नॉमिनीला पैसे मिळणार आहेत.

ही योजना सुरू झाल्यापासून तीन वर्षांनी स्वेच्छेने बंद केली जाऊ शकते. या योजनेत बोनसही मिळतो. तुम्ही जमा केलेल्या प्रत्येक हजार रुपयांवर तुम्हाला वर्षाला 60 रुपये बोनस मिळणार आहे.