पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास मिळणार 5 लाख 55 हजार रुपयांचे व्याज!

Published on -

Post Office Scheme : भूराजकीय तणावामुळे सध्या शेअर मार्केटमध्ये अस्थिर वातावरण पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून शेअर मार्केट मधील गुंतवणूक कमी झाली आहे. अस्थिरतेमुळे अनेकजण शेअर मार्केट व म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे पाहायला मिळत आहे. अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आता सोने आणि चांदीमध्ये अधिक इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहेत.

यासोबतच काही लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसा लावत आहेत. अशा स्थितीत आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका सुरक्षित बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी पर्यंत 5 लाख 55 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.  

कोणती आहे ही योजना ?

 तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा प्लॅन बनवला असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम एक चांगला पर्याय ठरणार आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम व्याज स्वरूपात मिळते. ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे.

म्हणजे तुम्हाला येथे एकदा एक रकमी पैसा गुंतवावा लागतो. अकाउंट ओपन केल्यानंतर यात तुम्हाला एकदा पैसा गुंतवावा लागतो आणि त्यानंतर मग तुम्हाला यावर दर महिन्याला एक निश्चित व्याज मिळते. या योजनेतील गुंतवणुकीवर 7.4% व्याजदराने रिटर्न दिले जात आहेत.

ही योजना पाच वर्षांची आहे. अर्थात योजनेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम तुम्हाला परत दिली जाते. या योजनेचे सिंगल आणि जॉईंट असे दोन प्रकारचे अकाउंट ओपन करता येतात.

सिंगल अकाउंट ओपन केल्यानंतर ग्राहकांना जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. जॉईंट अकाउंट साठी हीच मर्यादा 15 लाख रुपये आहे. अर्थात तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत या योजनेचे जॉइंट अकाउंट ओपन करून 15 लाखांची इन्व्हेस्टमेंट करू शकता. 

कसे मिळणार 5 लाख 55 हजाराचे व्याज 

जॉइंट अकाउंट ओपन केल्यानंतर या योजनेत 15 लाखाची गुंतवणूक केली तर दर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे गुंतवणूकदाराला एका वर्षात एक लाख 11 हजार रुपये व्याज मिळेल. पाच वर्षांचा विचार केला असता पाच लाख 55 हजाराचे व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News