Post Office च्या ‘या’ योजनेत 10 हजाराची गुंतवणूक केल्यास मिळणार 1 लाख 13 हजार 658 रुपयांचे व्याज

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. गेल्या आठ नऊ महिन्यांच्या काळात देशातील अनेक सरकारी आणि खाजगी बँकांनी फिक्स डिपॉझिटवरील व्याज कमी केले आहे.

यामुळे आता फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. एफडी ऐवजी आता इतर बचत योजनांमध्ये अधिक पैसा गुंतवला जातो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे.

दरम्यान जर तुम्हालाही बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती सांगणार आहोत. ज्या गुंतवणूकदारांना एक रकमी पैसा गुंतवता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची आहे.

या योजनेत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. यातून गुंतवणूकदार दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून एक लाख 13 हजार 658 रुपयांचे व्याज मिळू शकतात. 

कशी आहे योजना?

पोस्टाची आरडी योजना पाच वर्षांची आहे. ज्या लोकांना नियमित मासिक बचत करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची राहील. यात तिमाही चक्रवाढ व्याज आणि सरकारी हमी मिळते.

ही योजना नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी फारच उपयुक्त ठरत आहे. जे कमी जोखमीमध्ये आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू पाहत आहेत त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची आहे.

यात कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेत सिंगल किंवा जॉइंट अकाउंट ओपन करता येते. लहान मुलांच्या नावाने पालकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत प्रत्येक महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

या योजनेचा व्याजदर 6.7% आहे. यात गुंतवलेल्या रकमेवर कर्ज सुद्धा काढता येते. पण यासाठी अकाउंट एक वर्ष जून पाहिजे. तसेच गुंतवलेल्या रकमेपैकी जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. दरमहा 10 हजाराची गुंतवणूक केल्यास 5 वर्षांनी 7 लाख 13 हजार 658 रुपये मिळणार आहेत.

यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक सहा लाख रुपये राहील. तसेच एक लाख 13 हजार 658 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतील. पण या योजनेचे नियम फार कठोर आहेत.

जर गुंतवणूकदाराने एखाद्या महिनेत पैसे गुंतवले नाहीत तर त्याला शंभर रुपयांमागे एक रुपया दंड भरावा लागेल. म्हणजे दहा हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्याला शंभर रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News