पोस्ट ऑफिसची धमाल योजना ! 5 लाख गुंतवा अन 10 लाख 51 हजार मिळवा, कसं ते वाचाच

देशातील अनेक प्रमुख बँकां FD वर जबरदस्त व्याज ऑफर करत आहेत. ज्याप्रमाणे बँकेत एफडी करण्यावर चांगला जबरदस्त परतावा मिळतोय त्याच धर्तीवर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील पोस्टाकडून चांगला जोरदार परतावा दिला जात आहे.

Published on -

Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण येत्या काही दिवसांनी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असतील. बँकेच्या एफ डी मध्ये अलीकडे गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जात आहे. याचे कारण म्हणजे बँकेकडून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा दिला जात आहे.

देशातील अनेक प्रमुख बँकां FD वर जबरदस्त व्याज ऑफर करत आहेत. ज्याप्रमाणे बँकेत एफडी करण्यावर चांगला जबरदस्त परतावा मिळतोय त्याच धर्तीवर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील पोस्टाकडून चांगला जोरदार परतावा दिला जात आहे.

बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये देखील FD केली जाते. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट बचत योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखले जाते.

ही टाईम डिपॉझिट योजना एक, दोन, तीन आणि पाच वर्ष कालावधीची असते. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्टाची 5 वर्षाची टाईम डिपॉझिट योजना?

पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या टाईम डिपॉजिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.5% या दराने व्याज दिले जात आहे. खरंतर ही पाच वर्षांची योजना आहे मात्र गुंतवणूकदार या योजनेला एक्स्टेंड करू शकतात.

अर्थातच, योजनेचा कालावधी संपल्यानंतर आणखी पाच वर्षांसाठी ही योजना वाढवली जाऊ शकते. म्हणजेच गुंतवणूकदाराला दहा वर्ष कालावधीसाठी सुद्धा गुंतवणूक करता येऊ शकते. पाच वर्षांऐवजी जर दहा वर्ष कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना अधिकचा नफा मिळतो.

 

5 लाखाचे दहा लाख 51 हजार कसे होणार?

5 लाखाचे दहा लाख बनवायचे असतील तर तुम्हाला पोस्टाच्या टाईम डिपॉझिटमध्ये दहा वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही दहा वर्षासाठी पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दहा वर्षांनी या योजनेतून दहा लाख 51 हजार 175 रुपये मिळणार आहेत.

अर्थातच गुंतवणूकदाराला फक्त व्याज म्हणून पाच लाख 51 हजार 175 रुपये मिळणार आहेत. जर चार लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला आठ लाख 40 हजार 940 रुपये मिळणार आहेत. जर तीन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सहा लाख तीस हजार 705 रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe