पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकरकमी इतकी गुंतवणूक करा, दरमहा मिळणार 6000 रुपयांचे व्याज 

Published on -

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस कडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना सुरू करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम हे देखील एक लोकप्रिय सेविंग स्कीम आहे. यामध्ये सर्वच वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात.

खरे तर या वर्षात आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आली असल्याने बँकांनी फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले आहे. याचा परिणाम म्हणून आता सर्वसामान्य गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांना प्राधान्य दाखवत आहेत.

बँकांच्या एफडी योजनेतून ग्राहकांना अपेक्षित परतावा मिळत नसल्याने आता अनेकजण पोस्टाच्या बचत योजनेकडे वळले आहेत. दरम्यान जा गुंतवणूकदारांना पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करायचे असेल त्यांच्यासाठी मंथली इनकम स्कीम चा पर्याय बेस्ट राहणार आहे.

या योजनेत गुंतवणूकदारांना एक रकमे पैसा गुंतवावा लागतो त्यानंतर मग त्यांना दर महिन्याला एक फिक्स व्याज मिळतं. महत्वाची बाब म्हणजे या योजनेत गुंतवणूकदार त्यांच्या जोडीदारासमवेत गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे तुम्हाला या दिवाळीत सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची मंथली इनकम स्कीम फायद्याचे ठरणार आहे.

प्रत्येक महिन्याला मिळणार 6000 रुपयांचे व्याज 

मंथली इनकम स्कीम पाच वर्षांची असते. या योजनेत एकदा गुंतवणूक केली की दर महिन्याला फिक्स व्याज मिळत. या योजनेत सिंगल तसेच जॉइंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन केलं तर गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नऊ लाखांची गुंतवणूक करता येते.

पण जॉईंट अकाउंट ओपन केल्यास गुंतवणूकदारांना अधिक पैसा जमा करता येतो. संयुक्त खातेधारकांना एकूण 15 लाखांची गुंतवणूक करता येते. अर्थात तुम्ही तुमच्या पत्नी समवेत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसह या योजनेत 15 लाखांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट करू शकता.

या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सद्यस्थितीला 7.4 टक्के दराने परतावा दिला जातोय. विशेष म्हणजे या योजनेतून मिळणारे व्याज थेट खातेधारकांच्या बचत खात्यात वर्ग केले जाते. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला गुंतवलेली रक्कम परत मिळते. जॉइंट अकाउंट ओपन करून 15 लाखांची इन्व्हेस्टमेंट केली तर प्रत्येक महिन्याला 9250 रुपयांचे व्याज मिळू शकते.

जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने त्याच्या पत्नी समवेत किंवा इतर सदस्यांसमवेत या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून दहा लाखांचे गुंतवणूक केले तर त्यांना दर महिन्याला 6167 रुपयांचे व्याज मिळणार आहे. म्हणजे पाच वर्षांच्या काळात सदर गुंतवणूकदारांना तीन लाख 70 हजार वीस रुपये व्याज मिळणार आहे. वार्षिक आधारावर 74 हजार 4 रुपये व्याज मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe